Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

भजन-कीर्तनाचा त्रास होतो’ म्हणणार्‍या अधिकार्‍यांना मंदिर समितीतून हाकला

team by team
September 23, 2022
in राज्य
0
नवरात्रोत्सवात ‘सेक्स-तंत्र शिबीर’ हिंदू धर्माच्या विकृतीकरणासाठी ?, आयोजकांवर गुन्हे दाखल करून कार्यक्रमावर बंदी घाला
नंदूरबार  l  प्रतिनिधी 
अवघ्या महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात प्रतीदिन हजारो भाविक येऊन विठुरायाच्या केवळ दर्शनाने आपल्या भक्तीची भूक भागवतात. या धार्मिक नगरीत परंपरागत विठुरायाचा गजर भजन, कीर्तन, नामजप आदींच्या माध्यमातून त्याची भक्ती करतात. असे असतांना मंदिराचे सरकारनियुक्त कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांनी मनमानी पद्धतीने मंदिरातील भजन, कीर्तन आणि नामजप यांवर तडकाफडकी बंदी आणली.
ही कृती अवघ्या विठ्ठलभक्तांच्या भावना दुखावणारी असून हिंदु जनजागृती समिती या निर्णयाचा तीव्र निषेध करते. हा निर्णय घेण्यामागे ‘सभामंडपात मंदिर समितीचे कार्यालय असल्याने कामकाज करताना भजन-कीर्तनाचा त्रास होतो’ असे संतापजनक कारण देण्यात आले.
मंदिराच्या देवनिधीतून मिळणारा पगार घेणार्‍या, मात्र धार्मिक परंपरांविषयी आदर नसणार्‍या आणि या परंपरा बंद करायला निघालेल्या अशा अधिकार्‍यांना मंदिर समितीतून हाकलायला हवे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे. या मागणीचे निवेदन समितीच्या शिष्टमंडळाने सोलापूरचे उप-जिल्हाधिकारी श्री. विठ्ठल उदगले यांच्याकडे दिले. या वेळी सर्वश्री. बाबू ढगे, मोहन क्षीरसागर, विष्णू जोशी हे उपस्थित होते.
हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजन बुणगे या वेळी म्हणाले की, मंदिराच्या सुव्यवस्थापनासाठी देवस्थान समितीचे कार्यालय आहे कि कार्यालयाच्या सोयीसाठी मंदिर आहे ? जर समितीच्या कार्यालयातील कर्मचार्‍यांना भजन-कीर्तनाचा त्रास होत असेल, तर त्यांनी मंदिराबाहेर त्यांचे कार्यालय थाटावे. त्यांना भजन कीर्तनाचा त्रास होतो. हे अत्यंत वेदनादायी आहे. असे अधिकारी धार्मिक गोष्टींचा आदर ठेवू शकत नाहीत, त्यामुळे त्यांना समितीतून हाकलून लावायला हवे.
भजन-कीर्तन बंद करण्यामागील मंदिर समितीच्या अधिकार्‍यांनी सांगितलेली अन्य कारणेही चुकीची आहेत. या वेळी शिष्टमंडळातील प्रतिनिधींनी म्हणाले की, मंदिर समितीने यापूर्वी मंदिराला दान मिळालेले गोधन कसायांना विकले; दान मिळालेल्या दागिन्यांच्या मोजमापात घोटाळा केला, दागिने गहाळ केले; दान मिळालेली शेकडो एकर भूमी गहाळ केली; दान मिळालेल्या निधीच्या नोंदी-पावतीपुस्तके नीट ठेवली नाहीत आदी अनेक भ्रष्टाचार करून देवनिधीची लूट करण्याचे महापापच केले आहे. तरी ही विठ्ठलद्रोही मंदिर समिती बरखास्त करावी, कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांना तत्काळ बडतर्फ करावे आणि श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिर सरकारीकरणमुक्त करावे, अशा मागण्याही केल्या.
या संदर्भात अंबेजोगाई येथील उप-विभागीय अधिकारी श्री शरद झाडके यांना, तर सांगोला येथे निवासी नायब तहसिलदार  किशोर बडवे यांनाही निवेदन देण्यात आले. अंबेजोगाई येथे ह.भ.प. डॉ. रंगनाथ गर्जाले, अमोल घोडक, बालाजी बारस्कर; तर सांगोला येथे सर्वश्री संतोष पाटणे, गणपत पटेल, कैलास राणावत, डॉ. मानस कमलापूरकर, अतुल चव्हाण, सागर मोहिते, गणेश सुरवसे, अक्षय क्षीरसागर, लक्ष्मीकांत पाचंगे, सागर माळी, महेश चौधरी आदी उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

ढोंगसागाळी आश्रम शाळेत तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन

Next Post

क्रीडा विषयक अनुदानासाठी प्रस्ताव सादर करावे

Next Post
क्रीडा विषयक अनुदानासाठी प्रस्ताव सादर करावे

क्रीडा विषयक अनुदानासाठी प्रस्ताव सादर करावे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add