शहादा l प्रतिनिधी
स्वातंत्र्यसेनानी शिक्षण व सहकारमहर्षी स्व.अण्णासाहेब पी.के.पाटील यांच्या जयंतीनिमित्त
“श्री पी के अण्णा पाटील फाउंडेशन, शहादा” व
“विविध शहर व ग्राम लेवा पाटीदार ग्लोबल गुजर मंडळ (VSGGM)” यांच्या संयुक्त विद्यमाने दि.8ऑक्टोंबर 2022 शनिवार रोजी मोफत भव्य हृदयरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.परिसरातील सर्व गरजु रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
दि.8 ऑक्टोंबर शनिवारी सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत अभियांत्रिकी महाविद्यालय,पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ, विद्याविहार-लोणखेडा येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.हे शिबीर फक्त रोगनिदान म्हणजे तपासणी शिबीर आहे .हृदयरोग तज्ज्ञांच्याद्वारे तपासणी केली जाणार आहे.ईसीजी (ईलेक्ट्रोकार्डोओग्राम),२ डी इको (हृदयाची सोनोग्राफी),अँजिओग्राफी. ज्या रुग्णांना डॉक्टरांनी अँजिओग्राफी करावयास सांगितली असेल त्यांची तपासणी तज्ञ डॉक्टरांच्या द्वारे अल्पदरात करण्यात येईल.
जर त्या रुग्णावर अँजिओप्लास्टी करण्याची वेळ आली तर रुग्णावर संपूर्ण मोफत उपचार करण्यात येतील.अँजिओप्लास्टी,बायपास सर्जरी (CABG) केली जाणार आहे.तपासणीस येणा-या रुग्णांसाठी सुचना अशा आहेत.येतांना आपले जुने रक्ताचे रिपोर्ट, जुना इसीजी, एक्सरे किंवा ईतर रिपोर्ट व औषधांचे प्रीस्क्रीप्शन,औषधे असतील तर ते सोबत आणावे.पुढील उपचारासाठी आपणांस सबंधीत तज्ञ डॉक्टर सल्ला देतील त्याप्रमाणे आपणास निर्णय घ्यायचे आहेत. योग्य नियोजनासाठी आपली नावनोंदणी आवश्यक आहे. दिनांक 1ऑक्टोबर 2022 पर्यंत प्रत्यक्ष किंवा फोन करुन नावनोंदणी करुन घ्यावी.ह्या शिबिरात फक्त 400 नोंदणीकृत रुग्णांचीच तपासणी करण्यात येईल.
म्हणून पूर्वनोंदणी करून घेणे
तपासणी तज्ञ डॉ. मनोज पटेल (Cardiologist) हृदयरोग तज्ञ विघ्नहर्ता सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, धुळे हे करणार आहेत.नाव नोंदणी व अधिक माहिती साठी संपर्क तुलसी मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटल, हॉटेल पटेल रेसिडेन्सी जवळ, डोंगरगाव रोड, शहादा (मो 7620432440),प्रा.मिलिंद जगन्नाथ पाटील प्राध्यापक, अभियांत्रिकी महाविद्यालय, लोणखेडा(मो 8208042064) यांच्या कडे करावी.असे आवाहन आयोजक श्री.पी.के. अण्णा पाटील फाउंडेशन, शहादा विविध शहर व ग्राम लेवा पाटीदार ग्लोबल गुजर मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.








