Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

चिनोदा शिवारात केळीचे झाडे कापून नुकसान

team by team
August 26, 2021
in क्राईम
0
चिनोदा शिवारात केळीचे झाडे कापून नुकसान
तळोदा । प्रतिनिधी
 तळोदा तालुक्यातील चिनोदा शेत शिवारातील केळीचे झाडे कापून नासधूस करून नुकसान केल्याची घटना सोमवार दि.२३ ऑगस्ट रोजी घडली. या घटनेमुळे संबंधित शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून अज्ञात माथेफिरूचा तपास करुन बंदोबस्त करण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकर्‍यांने केली आहे.
     सविस्तर वृत्त असे की, शेतकरी उमाकांत माधवराव पाटील यांनी आपल्या चिनोदा शिवारातील सर्व्हे नंबर ६४/१/१ या क्षेत्रात साडेतीन एकर क्षेत्रात केळीची लागवड केली आहे. सोमवार रोजी शेतकरी उमाकांत पाटील आपल्या केळीच्या शेतात गेले असता त्यांना शेतातील केळीची ३० ते ३५ झाडे कापून नुकसान करून नासधूस झाल्याचे दिसून आले. अशा घटनेमुळे परिसरातील शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेती पिकांचे नुकसान करणार्‍या अज्ञात माथेफिरुचा बंदोबस्त करण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकर्‍यांने केली आहे.
     यावर्षी पावसाळा सुध्दा समाधानकारक नसल्यामुळे पिके सुध्दा जेमतेम स्थितीत असल्याने जी पिके आहेत ती जगविण्यासाठी शेतकरी रात्रंदिवस मेहनत घेतांना दिसून येत आहे. चिनोदा परिसरात केळी या पिकाची बर्‍यापैकी लागवड करण्यात आली आहे. शेतकरी घाम गाळून केळी पिकाचे संगोपन करत आहे. मात्र समाधानकारक पाऊस नसल्याने त्यातच अशा अज्ञात माथेफिरुकडून केळीचे झाडे कापून नुकसान केल्याने अशा संकटामुळे शेतकरी पूर्णपणे मेटाकुटीस आला आहे. केळी पिकावर सुरूवातीपासूनच शेतकऱ्यानी अतोनात खर्च केला आहे.
     केळी लागवडीसाठी लागणारे चांगल्या दर्जाचे केळीचे खोड तसेच त्यात ठिबक सिंचन करणे, विविध महागडी खते, औषधी व फवारणी यांचा मोठ्या प्रमाणावर खर्च येत असतो. मात्र अशा अज्ञात माथेफिरुंकडून अशाप्रकारे शेती पिकांची नासधूस करण्यात येत असल्यामुळे शेतकर्‍यांमध्ये प्रचंड भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी अशा अज्ञात माथेफिरूचा शोध घेऊन बंदोबस्त करण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकर्‍यांकडून करण्यात येत आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

नवापूर तालुक्यातील भोंनआमळा येथे वनविभागाच्या कारवाईत साडे पाच लाखांचें अवैध लाकुडासह वाहन जप्त

Next Post

नंदुरबार तालुक्यातील बिलाडी ते नारायणपूर रस्त्यावर युवतीचा आढळला मृतदेह, पोलिसांकडून तपास सुरू

Next Post
नंदुरबार तालुक्यातील बिलाडी ते नारायणपूर रस्त्यावर युवतीचा आढळला मृतदेह, पोलिसांकडून तपास सुरू

नंदुरबार तालुक्यातील बिलाडी ते नारायणपूर रस्त्यावर युवतीचा आढळला मृतदेह, पोलिसांकडून तपास सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add