नवापूर l प्रतिनिधी
तालुक्यातील ८१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम नुकताच जाहीर झाला आहे. ग्रामपंचायत सदस्य पदासह थेट सरपंच पदाच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. कालपासून उमेदवारी नामनिर्देशन भरण्यास सुरुवात झाली.पहिल्या दिवशी ती सरपंच पदासाठी ३ नामनिर्देश पत्र दाखल करण्यात आहे.
जानेवारी २०२१ मे २०२२ या कालावधीत मुदत संपलेल्या व जून २०२२ ते सप्टेंबर २०२२ मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या तसेच नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी सदस्य पदासह थेट सरपंच निवडणूक कार्यक्रम सुरू होत आहे.
निवडणूक प्रक्रियेचे सर्व कामकाज नवापूर तहसिल कार्यालयात होणार आहे. नामनिर्देशन भरण्यास येताना कमीत कमी लोकांना सोबत आणावे. निवडणूक प्रक्रियेत निर्धारित केलेल्या वेळेत आपले कामकाज पूर्ण करून घ्यावे.
२१ ते २७ सप्टेंबर दरम्यान नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करणे, २८सप्टेंबर नामनिर्देशनपत्र छाननी करणे, ३० सप्टेंबर नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा अंतिम दिवस व निवडणूक चिन्ह देऊन अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करणे. १३ ऑक्टोबर ला मतदान, १४ ऑक्टोबर ला मतमोजणी व निकाल घोषित केला जाईल. असे परिपत्रक राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकरयांनी काढले आहे. नवापूर तालुक्यातील ८१ ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम
२१ सप्टेंबर ते १४ ऑक्टोबर २०२२ या दरम्यान राबवला जाणार आहे.
निवडणूक लागलेल्या८१ ग्रामपंचायत :
मोठे कडवान, लहान कडवान, करंजी बुद्रुक2, कामोद खानापूर, चितवी, तिळासर, दापूर , देवलीपाडा (चितवी), नगारे, निजामपूर, निमदर्डा, बिलमांजरे, भवरे, मळवान, मेंहदीपाडा, मौलीपाडा, वडसत्रा, वागदी, अंजने, आमलाण, करंजी खुर्द, केलपाडा,
खातगाव, घोगलपाडा झामणार, नलावीपाडा नवागाव नागझरी, बिलदा, बिलबारा, सोनपाडा, हलदाणी, उबर्डी, कोळदा, खांडबारा घोडजामने चिखली, चौकी देवलीपाडा नावली पांगराण, बेधारफळी बंधारे बिजगाव, मोगरानी, शिर्वे, आमपाडा, कारेघाट, कोकणीपाडा, खैरवे,
जामतलाव, जामदा, झामट्यावड, देवमोगरा, बालअमराई,भादवड, रायपुर, वडखुंट, वडदे, वासदा, सोनारे दिगर, करंजाळी, चिंचपाडा, डोगेगाव, तारापूर, थुवा, दुभवे नवापाडा, बोरचक, भरडू , लक्कडकोट, सावरट, खोकसा, गडद, चोरविहीर, तारपाडा, पिंप्रीपाडा, बोकडझर, वडफळी, बोरपाडा.








