Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

श्री. पी. के. अण्णा पाटील फाउंडेशनचे यंदाचे पुरुषोत्तम पुरस्कार जाहीर, व्यक्ती स्तरावर प्रसिद्ध जादूगार जितेंद्र रघुवीर तर संस्था स्तरावरील पुरस्कार केशवस्मृती प्रतिष्ठानला

team by team
September 22, 2022
in राज्य
0
श्री. पी. के. अण्णा पाटील फाउंडेशनचे यंदाचे पुरुषोत्तम पुरस्कार जाहीर, व्यक्ती स्तरावर प्रसिद्ध जादूगार जितेंद्र रघुवीर तर संस्था स्तरावरील पुरस्कार केशवस्मृती प्रतिष्ठानला
शहादा   l
     येथील श्री. पी. के. अण्णा पाटील फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी सहकार महर्षि श्री. अण्णासाहेब पी. के. पाटील यांच्या जयंती दिनानिमित्त सामाजिक, शैक्षणिक व संशोधन क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या महाराष्ट्रातील व्यक्ती व संस्थेला पुरुषोत्तम पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.यावर्षी व्यक्ती स्तरावर पुरूषोत्तम पुरस्कार पुणे येथील प्रसिद्ध जादूगार जितेंद्र रघुवीर यांना तर संस्था स्तरावरील पुरस्कार जळगाव येथील केशवस्मृती प्रतिष्ठानला प्रदान केला जाणार आहे.पुरस्काराचे स्वरुप रुपये एक लाख व मानचिन्ह या स्वरुपाचे असते.
      यावर्षी 9 ऑक्टोबर 2022 रोजी प्रदान करण्यात येणाऱ्या व्यक्ती व संस्था स्तरावरील पुरस्कारांची घोषणा फाऊंडेशनचे अध्यक्ष दीपकभाई पाटील व सचिव प्रा.मकरंद पाटील यांनी केली आहे. संस्था स्तरावरील पुरुषोत्तम पुरस्कार केशवस्मृती प्रतिष्ठान, जळगाव या सामाजिक, शैक्षणिक व वैद्यकीय क्षेत्रात गत 30 वर्षापासून सेवाभावी प्रकल्प राबविणाऱ्या संस्थेला दिला जाणार आहे. संस्थेने जळगाव शहरातील भरकटलेल्या मुलांना आधार देणारा समतोल प्रकल्प, जेष्ठ नागरीकांसाठी मातोश्री आनंदाश्रम, बालकांना हक्क मिळवून देण्यासाठी चाईल्ड लाईन क्र.1098 सारखे उपक्रम सेवावस्ती विभागातर्फे राबविले आहेत.
वैद्यकिय क्षेत्रात गरजू रुणांना वेळेवर रक्त पुरवठा करण्यासाठी माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तपेढी, नेत्रदान चळवळ व्यापक करण्यासाठी मांगीलालजी बाफना नेत्रपेढी, वस्ती भागात आरोग्यसेवा केंद्र, बाल संस्कार केंद्र, विशेष मार्गदर्शन वर्ग प्रतिष्ठान तर्फे चालविले जातात. संस्थेमार्फत कौशल्य विकास अभ्यासक्रम शिकविला जात असून भारतीय संस्कृतीचे जतन व तिचा वारसा पुढील पिढीकडे हस्तांतरीत होण्यासाठी भूलाबाई महोत्सवाचे आयोजन केले जाते.
शासनाच्या विविध योजनांची माहिती तळागाळातील महिलापर्यंत पोहचविणे. आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक विकासाच्या प्रक्रियेत त्यांना सामावून घेणे व त्यांचे सक्षमीकरण करणे यासाठी संवादिनी अभियान महिला व बालविकास विभाग, महिला आर्थिक विकास महामंडळ, युनिसेफ व महाराष्ट्र शासनाच्या माहिती जनसंपर्क महासंचालनालय यांनी संयुक्तपणे राबविले होते. त्याची उत्तर महाराष्ट्र विभागाची जबाबदारी केशवस्मृती प्रतिष्ठानाने पार पाडली आहे. राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने दिला जाणारा शाहू, फुले आंबेडकर पुरस्कार केशवस्मृती प्रतिष्ठानला सन 2016-17ला प्राप्त झाला आहे. प्रतिष्ठानच्या वतीने पुरस्काराचा स्विकार अध्यक्ष व सचिव करणार आहेत.
     व्यक्ती स्तरावरील पुरुषोत्तम पुरस्कार कोथरुड, पुणे येथील जादुगार जितेंद्र रघुवीर भोपळे यांना दिला जाणार आहे. त्यांनी आजोबा प्रसिध्द जादुगार रघुवीर व वडिल जादुगार विजय रघुवीर यांचे कडून वयाच्या पाचव्या वर्षापासून जादुचे धडे घेतले असून आतापावेतो 2000 पेक्षा अधिक जादुचे प्रयोग 27 देशांत केले आहेत. जादुच्या प्रयोगांसोबत नाट्य, नृत्य व गायन कलेतही ते पारंगत आहेत. त्यांनी पुणे विद्यापीठातून अभियांत्रीकी (प्रोडक्शन) ची पदवी तसेच अमेरीकेच्या नॉरफॉल्क येथील विद्यापीठाची एम.एस. पदव्युत्तर पदवी धारण केली आहे. त्यांना बालगंर्धव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. नॅशनल डिफेन्स अॅकेडेमीच्या पुरस्कारासह त्यांना देशविदेशातील विभिन्न पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांनी जनतेत जादु या कलेविषयी जागृती निर्माण होण्यासाठी आतापावेतो देश विदेशात कार्यशाळा, शिवीरांचे आयोजन केले असून विविध वृत्तपत्रातून या कलेची माहिती सर्वदूर पोहच होण्यासाठी विपूल लेखन केले आहे. त्यांच्या या जनजागृतीच्या कार्याचा गौरव म्हणून पुरुषोत्तम पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.अशी माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष  दीपकभाई पाटील व सचिव प्रा.मकरंद पाटील यांनी दिली आहे. सदर पुरस्कार प्रदान समारंभ रविवार दिनांक 9 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 9:30 वाजता पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या प्रांगणात संपन्न होणार आहे.
   आता पावेतो व्यक्ती स्तरावर प्रा. डॉ. राम ताकवले (माजी कुलगुरु पुणे विद्यापीठ, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक व इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ नवी दिल्ली),डॉ. यु. म. पठाण (संत साहित्याचे गाढे अभ्यासक ), डॉ. विजय भटकर(परम महासंगणकाचे प्रमुख वैज्ञानिक ), डॉ. वसंत गोवारीकर (माजी संचालक, इत्रो, माजी कुलगुरु पुणे विद्यापीठ), प्रा. सुखदेव थोरात (माजी चेअरमन, विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली.) डॉ. नागनाथ कोतापल्ले(माजी कुलगुरु डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद), डॉ. जयंत नारळीकर (जेष्ठ गणितज्ज्ञ व भौतिक शास्त्रज्ञ, पुणे),डॉ. दिपक जयंतराव टिळक( कुलगुरु, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे),
डॉ. बी. के. गोयल (बॉम्बे हॉस्पीटल, बॉम्बे ),डॉ. नरेंद्र जाधव(सदस्य, नियोजन आयोग नवी दिल्ली), डॉ. सदानंद श्रीधर मोरे(प्राध्यापक तत्वज्ञान विभाग, पुणे विद्यापीठ, पुणे), सिंधुताई सपकाळ (अध्यक्षा, सन्मती बाल निकेतन संस्था,)डॉ. शरद पी. काळे(भाभा अणुसंशोधन केंद्र मुंबई येथील न्युक्लीअर अॅग्रीकल्चर व बायोटेक्नॉलॉजी विभागचे प्रमुख), पोपटराव पवार(सरपंच हिवरे बाजार अहमदनगर), माजी विधानपरिषद सदस्य जेष्ट कवी पद्मश्री ना. धों. महानोर,
 ज्ञानदेव गंगाराम हापसे उर्फ डॉ. डी. जी. हापसे (उस तज्ज्ञ), सतीश मराठे (संचालक रिझर्व बँक ऑफ इंडिया),पानिपतकार विश्वास पाटील(जेष्ठ साहित्यीक मुंबई),श्रीमती राहीबाई सोमा पोपेरे(कोंभाळणे ता. अकोले जि. अहमदनगर) यांना प्रदान करण्यात आला आहे.तर संस्था स्तरावर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक,महात्मा ज्योतिबा फुले कृषि विद्यापीठ राहुरी,श्री क्षेत्र चैतन्य अध्यात्मिक केंद्र (दुधिबरे),मराठी साहित्य परिषद पुणे,महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा पुणे,उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव,
कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिक,
भगिनी निवेदिता ग्रामीण विज्ञान संस्था बहादरपुर जि. जळगाव,साधना ट्रस्ट पुणे,
हेल्पर्स ऑफ दि हॅन्डिकॅप्ड कोल्हापूर,सेवाग्राम आश्रम वर्धा,डॉ. लाजपतराय मेहरा न्युरोथेरपी सुर्यमाळ जि. ठाणे,पालवी प्रतिष्ठान पंढरपूर,इतिहासाचार्य वि. का. राजवाडे संशोधन मंडळ धुळे,मराठी विज्ञान परिषद मुंबई,श्रध्दा रिहॅबीलीटेशन फाउंडेशन वेणगाव,कर्जत जि. रायगड, नाम फाउंडेशन पुणे,टिळक राष्ट्रीय विद्यालय, खामगाव जि.बुलढाणा यांचा समावेश आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

शेतकऱ्यांनी कृषी यांत्रिकीकरण योजनेचा लाभ घेण्याचे कृषी विभागाचे आवाहन

Next Post

वडफळी येथील असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

Next Post
वडफळी येथील असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

वडफळी येथील असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रभाग 5 मधील रस्ता डांबरीकरण कामाचे शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

प्रभाग 5 मधील रस्ता डांबरीकरण कामाचे शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

January 25, 2026
श्रॉफ हायस्कूलमध्ये ई-कचरा जनजागृती व संकलन अभियान

श्रॉफ हायस्कूलमध्ये ई-कचरा जनजागृती व संकलन अभियान

January 25, 2026
रोहयो’ कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन, काळ्या फीत लावून शासनाचा केला निषेध

रोहयो’ कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन, काळ्या फीत लावून शासनाचा केला निषेध

January 25, 2026
राष्ट्रीय तेंग सु डो कोरियन कराटे स्पर्धेत निखिल पाटीलने पटकावले रौप्य पदक

राष्ट्रीय तेंग सु डो कोरियन कराटे स्पर्धेत निखिल पाटीलने पटकावले रौप्य पदक

January 25, 2026
चिपलीपाड्यात रब्बी शेतीचा जागर; कृषी तज्ज्ञांनी दिला शाश्वत शेती’चा मंत्र

चिपलीपाड्यात रब्बी शेतीचा जागर; कृषी तज्ज्ञांनी दिला शाश्वत शेती’चा मंत्र

January 25, 2026
नंदुरबार येथे भव्य नेत्र तपासणी व मोतीबिंदू शिबिर

नंदुरबार येथे भव्य नेत्र तपासणी व मोतीबिंदू शिबिर

January 25, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add