नंदूरबार l प्रतिनिधी
बंदुकीचा धाक दाखवून सराफ व्यापाऱ्याला लुटणारी टोळी अखेर जेरबंद , 6 जणांना पोलिसांनी अटक केली.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 16 सप्टेंबर 2022 रोजी 18 वा . सुमारास वडवद ते उमर्दे खुर्द दरम्यान म्हशींच्या तबेल्याजवळ रोडवर रुपेश सुमनलाल सोनार रा . शिवाजी रोड , नंददर्शन कार्यालय जवळ , नंदुरबार हे त्यांचे कोपर्ली येथील सोने चांदी विक्रीचे दुकान बंद करुन त्यांच्या मित्रासह त्यांची इंडीगो सी.एस. कार (क्र. MH – 18 W – 3614) हिच्याने घरी नंदुरबार येथे जात असतांना त्यांच्या गाडीच्या पुढे इनोव्हा गाडीतून आलेल्या तीन अनोळखी इसमांनी त्यांच्या गाडीसमोर इनोव्हा गाडी आडवी लावून फिर्यादी व साक्षीदार यांच्या दिशेने मिरचीपूड भिरकावून 9 लाख 76 हजार 720 रुपये किमतीचे सोने , चांदीचे दागिने , रोख रक्कम व मोबाईल बंदुकीचा धाक दाखवून जबरदस्तीने हिसकावून घेतले म्हणून रुपेश सुमनलाल सोनार यांच्या फिर्यादीवरून नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात भा.द.वि. कलम 394,341,34 सह आर्म ॲक्ट 3/25 प्रमाणे अज्ञात आरोपीतांविरुध्द् गुन्हा दाखल आहे .
सदर घटनेची माहिती मिळताच नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे , स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर तसेच नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांना कळवून माहिती दिली व नियंत्रण कक्षाने जिल्ह्यातील सर्व ठिकाणी तसेच धुळे जिल्ह्यातील नंदुरबारलगत असलेल्या पोलीस ठाण्यांना देखील नाकाबंदी करणेबाबत सांगितले . त्याअनुषंगाने नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे , स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर व अमंलदार तसेच नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार व अमंलदार यांनी अज्ञात आरोपीतांच्या वाहनाचा पाठलाग करत होते ,
धुळे जिल्ह्यातील निजामपूर पोलीस ठाणे , धुळे येथे देखील नाकाबंदी लावण्यात आलेली असल्याने आरोपीतांनी वाहन पुन्हा मागे फिरवून आखाडे गावाच्या दिशेने घेतले . रात्रीचा वेळ असल्याने आरोपीतांनी वाहन शेतात सोडून दिले व आरोपी सदर ठिकाणावरून पळून जाण्यात यशस्वी झाले . आरोपी सोडून गेलेल्या वाहनाची पोलीसांनी पाहणी केली असता वाहनामध्ये आरोपीतांनी रुपेश सुमनलाल सोनार यांचे बंदुकीचा धाक दाखवून जबरीने हिसकावलेले 9 लाख 76 हजार 720 रुपये किमतीचे सोने , चांदीचे दागिने , रोख रुपये , मोबाईल व गुन्ह्यात वापरलेली चारचाकी इनोव्हा वाहन व बंदुक पोलीसांनी जप्त करुन ताब्यात घेतली . गुन्ह्यातील जबरीने हिसकावून नेलेला मुद्देमाल पोलीसांना हस्तगत करण्यात यश आले होते ,
परंतु धाडसी जबरी चोरीमधील अज्ञात आरोपीतांचा शोध घेण्याचे मोठे आवाहन अजूनही पोलीसांसमोर होतेच , त्यामुळे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी गुन्ह्याचे तपासकामी स्थानिक गुन्हे शाखा व नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे 6 वेगवेगळे पथके तयार करुन दाखल गुन्ह्यातील अज्ञात आरोपीताचाशोध घेवून कारवाई करणेबाबत आदेशीत केले . तसेच ताब्यात घेतलेल्या वाहनाची बारकाईने पाहणी केली असता वाहनामध्ये अनेक महत्वाचे पुरावे पोलीसांच्या हाती लागले . त्यामुळे पोलीसांना पुढील तपासासाठी गती मिळाली . नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे एक पथक वाहनात मिळून आलेल्या पुराव्याच्या आधारावर धुळे येथे जावून संशयीत आरोपीतांचा शोध घेत होते .
त्यांना सदर ठिकाणी गुन्ह्याच्या अनुषंगाने उपयुक्त माहिती मिळाली त्यामध्ये जबरी चोरी केलेले आरोपी हे धुळे येथील असल्याचे निष्पन्न झाले होते . आरोपींचा धुळे येथे शोध घेतला परंतु कोणीही आरोपी मिळून आला नाही . दि. 19 सप्टेंबर रोजी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की , झालेल्या घटनेतील आरोपी हे धुळे व नंदुरबार येथील असून त्यांना नंदुरबार येथील 5 ते 6 संशयीतांनी मदत केली असल्याची अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना कळवून बातमीची खात्री करुन कायदेशीर कारवाई करणेबाबत त्यांनी आदेश दिले . 5 स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी मिळालेल्या माहितीप्रमाणे
स्थाकिन गुन्हे शाखेच्या पथकाने खोडाई माता रोड व चिंचपाडा भिलाटी परिसरातून दोन संशयीत इसमांना ताब्यात घेवून त्यांचे नाव गांव विचारले असता पावबा भिकन आखाडे रा . सिंदगव्हाण ता . जि . नंदुरबार दिपक शाम ठाकरे रा . चिंचपाडा भिलाटी , नंदुरबार असे सांगितले . ताब्यात घेतलेल्या दोन्ही संशयीतांना गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता ते कोणतेही समाधानकारक उत्तर देत नव्हते , म्हणून दोन्ही संशयीतांना स्थानिक गुन्हे शाखा येथे आणून सखोल विचारपूस केली असता , संशयीत आरोपी पावबा आखाडे याने सदरचा गुन्हा त्याचे साथीदार गोविंदा सामुद्रे , मुकेश ठाकरे , दिपक ठाकरे , विकास ऊर्फ नागू ठाकरे , बॉबी बैसाणे सर्व रा . नंदुरबार अशांनी घटनेच्या दोन दिवसाआधी कट रचून धुळे येथील मनोज पारेराव याच्या सांगण्यावरून सत्तार मेंटल , वसिम बाटला , बापू , पप्पू व अनोळखी एक इसम सर्व रा . धुळे असे सर्वांनी मिळून केल्याचे सांगितले . त्याप्रमाणे नंदुरबार येथील गोविंदा सामुद्रे , मुकेश ठाकरे , दिपक ठाकरे , विकास ऊर्फ नागू ठाकरे , बॉबी बैसाणे यांचा शोध घेतला असता ते बदलापूर जि . ठाणे येथे पळून गेल्याचे समजून आल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक तात्काळ बदलापूर जि . ठाणे येथे रवाना करण्यात आले व दि
21 सप्टेंबर 2022 रोजी बदलापूर जि . ठाणे येथून स्थानिक पोलीसांच्या मदतीने गोविंदा यशवंत सामुद्रे, मुकेश शामा ठाकरे, विकास ऊर्फ नागू अशोक ठाकरे तिन्ही रा . चिंचपाडा भिलाटी , नंदुरबार, विश्वजीत ऊर्फ बॉबी संजय बैसाणे रा . समता नगर , नंदुरबार यांना ताब्यात घेण्यात आले .
त्यांना स्थानिक गुन्हे शाखा येथे आणून तपास केला असता त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल केले . ताब्यात घेण्यात आलेल्या सर्व आरोपीतांना गुन्ह्याच्या पुढील तपासकामी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे . तसेच त्यांनी आणखी काही गुन्हे केले आहेत का ? याबाबत तपास करीत आहोत . सदरची कामगिरी ही नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील , नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर , नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार , स्थानिक गुन्हे शाखेचे सहा . पोलीस निरीक्षक संदीप पाटील , पोलीस हवालदार महेंद्र नगराळे , राकेश वसावे पोलीस नाईका विशाल नागरे , मोहन ढमढेरे , राकेश मोरे , मनोज नाईक , सुनिल पाडवी , पोलीस कॉन्सटेबल / अभय राजपुत , आनंदा मराठे , राजेंद्र काटके , अभिमन्यु गावीत , रामेश्वर चव्हाण यांच्या पथकाने केली आहे .








