नंदूरबार | प्रतिनिधी
तळोदा तालुक्यातील बुधावली येथून अज्ञात चोरटयाने मोटरसायकल लंपास केल्याची घटना घडली आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तळोदा तालुक्यातील बुधावली येथे राहणार्या सुभाष गणेश पाडवी यांच्या घरासमोरील पत्र्याच्या छताखालून अज्ञात चोरटयाने २० हजार रूपये किंमतीची मोटरसायकल लंपास केल्याची घटना घडली आहे.
याप्रकरणी सुभाष गणेश पाडवी यांच्या फिर्यादीवरून तळोदा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटयाविरूध्द भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोहेकॉ. पौलद भिल करीत आहेत.








