नंदूरबार | प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील जगतापवाडी येथून एकाचा घराच्या अंगणातून २ लाखाची बोलेरो गाडी लंपास केल्याची घटना घडली आहे.
याप्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाख्ला करण्यात आला आहे. याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार शहरातील जगताप येथे राहणार्या कैलास जालमसिंग वळवी यांच्या राहत्या घराच्या अंगणातून २ इसमांनी दोन लाख रूपये किंमतीची बोलेरोगाडी (क्र.एम.एच.३९-एच.२१२४) लंपास केली.
याप्रकरणी कैलास जालमसिंग वळवी यांच्या फिर्यादीवरून नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात दोन इसमांविरूध्द भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास असई मुगल्या पाडवी करीत आहेत.








