नंदूरबार | प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील खोडाईमाता मंदिराजवळ पादचारी युवकाकडून बळजबरीने मोटरसायकलवर आलेल्या दोघांनी मोबाईल लंपास केल्याची घटना घडली आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार शहरातील खोडाईमाता मंदिराकडून जगतापवाडीकडे जाणार्या रामदास नारसिंग पावरा यांच्या ९ हजार रूपये किंमतीचा मोबाईल मोटरसायकलवर आलेल्या दोन अज्ञात इसमांनी बळजबरीने लंपास केल्याची घटना घडली आहे.
याप्रकरणी रामदास नारसिंग गपावरा रा.आचपा (पोस्ट धडगांव, ह.मु.जगतापवाडी,नंदुरबार) यांच्या फिर्यादीवरून नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात अज्ञात दोन इसमांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोहेकॉ. संदिप गोसावी करीत आहेत.








