नंदुरबार | प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील कवळीथ येथे वीज बिल भरणा केल्याचे सांगितल्याचा राग आल्याने एकाने वीज वितरण कंपनीचे वरिष्ठ तंत्रज्ञाला हाताबुक्यांनी मारहाण करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एकाविरूध्द शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलसी सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहादा तालुक्यातील कवळीथ येथील नवा प्लॉट परिसरात वीज वितरण कंपनीचे वरिष्ठ तंत्रज्ञ सिकंदर शहा मुक्तार शहा फकिर यांनी मोहन मंडळ यांना वीज वसुलीचे काम करीत असतांना वीज भरणा करा, असे सांगितले.
त्याचा राग आल्याने मोहन मंडळ यांनी सिकंदर शहा मुक्तार शहा फकिर यांना शिवीगाळ करीत हाताबुक्यांनी मारहाण करीत शासकीय कामात अडथळा आणला म्हणून सिकंदर शहा मुक्तार शहा फकिर यांच्या फिर्यादीवरून मोहन अतुल मंडळ रा.कवळीथ ता.शहादा याचा विरूध्द भादंवि कलम ३५३, ३३२, ३२३, ५०४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोसई माया राजपूत करीत आहे.








