नंदुरबार l
येथील महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित प्राथमिक शाळा व स्वामी विवेकानंद हायस्कूल, नंदुरबार येथे दि. 20 सप्टेंबर 2022 रोजी सनातन संस्थेमार्फत नंदुरबार शहरातील प्रसिद्ध उद्योगपती नितेश अग्रवाल यांच्यातर्फे शाळेतील 230 विद्यार्थ्यांना वह्या व टिफिन बॉक्स चे वाटप संपन्न झाले.
या कार्यक्रमाची सुरुवात प्रसिद्ध उद्योगपती नितेश अग्रवाल यांच्या शुभहस्ते सरस्वती मातेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून व शाळेचे मुख्याध्यापक वाय .एस .पाटील यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व प्राथमिक शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका नीता चौरे यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून व पुष्पहार अर्पण करून सुरुवात झाली.
या कार्यक्रमाला सनातन संस्थेचे साधक प्रा. सतीश बागुल व रवींद्र छोटालाल पवार, भावनाताई कदम ,भरत पंडित, चंद्रकांत भोई यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांना वह्या व टिफिन बॉक्स वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला . याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक वाय .एस. पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.व शाळेतील शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विविध गरजांची पूर्ती आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण यासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांची माहिती दिली व शाळेसाठी आर .ओ. वॉटर फिल्टर प्लांट ची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले असता प्रसिद्ध उद्योगपती नितीश अग्रवाल यांनी शाळेसाठी आर.ओ प्लांट उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
शाळेतर्फे पाहुण्यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत आणि सत्कार मुख्याध्यापक वाय. एस. पाटील ज्येष्ठ शिक्षक निंबा माळी यांनी केले .याप्रसंगी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय माळी यांनी केले तर सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार निंबा माळी सर यांनी मानले .कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर बंधू भगिनींनी परिश्रम घेतले. याप्रसंगी प्राथमिक व माध्यमिक शाळेतील सर्व विद्यार्थी व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.