नंदूरबार l प्रतिनिधी
सध्या राज्यातील अनेक गावात शहरात व शहादा लगतच्या ग्रामीण भागात मुलं पकडणारी टोळी आलेली आहे. अशा प्रकारचे संदेश व्हायरल होत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.त्यामुळे शहादा पोलीस ठाण्यातर्फे आवाहन करण्यात आले आहे.
यात म्हटले आहे की, शहादा पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व पोलीस पाटील यांना विनम्र आवाहन करण्यात येते की शहादा शहरात व शहादा लगतच्या ग्रामीण भागात मुलं पकडणारी टोळी आलेली आहे.
अशा प्रकारचे संदेश व्हायरल होत आहेत तरी सदरचे संदेश हे खरे नसून अशा प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, जर अशा प्रकारच्या घटना निदर्शनास आल्यात तात्काळ पोलीस स्टेशनला किंवा संबंधित अधिकाऱ्यांना संपर्क करून निदर्शनास आणून द्याव्यात तसेच सदर संदेश बाबत आपापल्या स्तरावर जनजागृती करून सर्वांना याबाबत माहिती द्यावी असे आवाहन शहादा पोलीस ठाण्यातर्फे करण्यात आले आहे.








