नंदुरबार l
जिल्हा एड्स नियंत्रण विभाग, जिल्हा रुग्णालय नंदुरबार व एस.ए.मिनिस्ट्रीज ट्रस्ट संचलित, एस.ए.मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे युवा दिन सप्ताहात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण झाले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा रुग्णालय व निम्स हॉस्पिटलचे डॉ.राजेश वसावे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्हा रुग्णालय नंदुरबार नितीन मंडलिक, युवारंग फाऊंडेनचे अध्यक्ष जितेंद्र लुळे, जिल्हा लेखापाल जिल्हा रुग्णालय नंदुरबार नरेंद्र सुलक्षणे, प्राचार्य नूतनवर्षां वळवी, उपमुख्याध्यापक विजय पवार, पर्यवेक्षिका वंदना जांबिलसा, पर्यवेक्षक मीनल वळवी, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक सी.पी.बोरसे, अरुण गर्गे आदी उपस्थित होते.
यावेळी एड्स प्रतिबंध विषयावर वक्तृत्व स्पर्धा तसेच फेस पेंटिंग स्पर्धा याच्या माध्यमातून शाळेतील विद्यार्थ्यांनी जनजागृती केली. त्यात लहान गटात आदित्य राजेंद्र चौधरी (प्रथम), पर्जन्य चंद्रशेखर पाटील (द्वितीय), स्वाती दिलीप पवारा (तृतीय), वरिष्ठ गटात इशिता दीपक भारती (प्रथम), वेदश्री नरेश शिंदे (द्वितीय), श्रुती चंद्रशेखर पवार (तृतीय), फेस पेंटिंगमध्ये लहान गटात रोशनी प्रभू पवार (प्रथम), अर्चना रंभा वळवी (द्वितीय), तन्वी कांतीलाल पावरा (तृतीय), फेस पेंटिंग वरीष्ठ गटात नाकीया हातिम बोहरी (प्रथम), कार्तिकी चंद्रशेखर पाटील (द्वितीय), पवन कृष्णा वळवी (तृतीय) ह्या विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
डॉ.राजेश वसावे यांनी विद्यार्थ्यांसमोर आपल्या मनोगत मांडताना सांगितले की, जे लोक इतिहास वाचत नाही ते इतिहासातील चुका पुन्हा करतात. कारण आफ्रिका सारख्या देशात स्वैराचाराने वागल्यामुळे देशात एड्स सारखा आजार बळावला. त्यामुळे देशातील अर्थव्यवस्था रसातळाला गेली. म्हणून स्वछंदी जीवन न जगता आदर्श जीवन जगण्यासाठी निर्बंध असणे आवश्यक आहे.
त्यामुळे विद्यार्थ्यांनी एड्सवर केलेले जनजागृतीचे कार्य कौतुकास्पद आहे. कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थीनी इशिता भारती आणि वेदश्री शिंदे यांनी प्रातिनिधीक स्वरूपात एड्स विषयावर भाषण दिले. कार्यक्रमासाठी मनिष पाडवी, खुशाल शर्मा यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रसाद दीक्षित यांनी केले. तर आभार विजय पवार यांनी मानले.








