Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

रासेयो स्वयंसेवक प्रतीक कदमला राष्ट्रपती पुरस्कार जाहीर

team by team
September 20, 2022
in राष्ट्रीय
0
रासेयो स्वयंसेवक प्रतीक कदमला राष्ट्रपती पुरस्कार जाहीर
नंदूरबार l प्रतिनिधी
येथील गजमल तुळशीराम पाटील महाविद्यालयाचा स्वयंसेवक प्रतीक माधव कदम याला नुकताच राष्ट्रपती पुरस्कार जाहीर करण्यात आला. हा पुरस्कार 24 सप्टेंबरला राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्थापना दिनानिमित्त राष्ट्रपती भवनातील दरबार हॉल येथे महामहीम राष्ट्रपती यांच्या हस्ते प्रदान होणार आहे.
 गजमल तुळशीराम पाटील महाविद्यालयचा विद्यार्थी प्रतिक कदम याने राष्ट्रीय सेवा योजनेच्या  माध्यमातून विविध उपक्रमात सक्रिय सहभाग घेऊन समाजसेवा, वन्यजीव सेवा अशा विविध क्षेत्रात भरीव कामगिरी केलेली आहे. त्याच्या या योगदानाची दखल घेत राष्ट्रीय सेवा योजनेतील सर्वोत्कृष्ट पुरस्कारासाठी त्याची निवड करण्यात आली आहे.
यासोबतच 2020-21 मध्ये दिल्ली येथील राजपथावर 26 जानेवारी 2021 ला प्रजासत्ताक दिनानिमित्त झालेल्या पतसंचलनात महाराष्ट्राच्या वतीने कॉन्टिजेन्ट कमांडर म्हणून महाराष्ट्राचे नेतृत्वही केलेले होते. सोबतच दिल्ली येथील युवा सांस्कृतिक महोत्सवात महाराष्ट्राचे नेतृत्व करत महाराष्ट्राची परंपरा लावणी नृत्य व बासरी वादन करून सांस्कृतिक प्रतिनिधित्वही केले होते.
कोरोना काळात ज्यावेळेस सर्वसाधारण नागरिक लसीकरणासाठी उत्सुक नव्हते त्यावेळी तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांमध्ये लसीकरणाबाबत जनजागृती करण्यासाठी ग्रामीण व शहरी भागात प्रतिकने पथनाट्य ही केले होते. 500 पेक्षा जास्त मास्क दत्तक गाव व बांधकाम मजूर यांना वाटप केले होते.
वृक्षरोपण तसेच वन्यजीव यांच्या संवर्धनासाठी जवळपास 500 पेक्षा जास्त सापांना देऊन त्यांना वनांमध्ये सोडण्याचे कामही प्रतीकने केलेले आहे. नंदुरबार परिसरात तो सर्पमित्र म्हणूनही प्रसिद्ध आहे. त्याच्या या राष्ट्रपती पुरस्काराच्या निवडीबद्दल संस्थेचे चेअरमन मा.आ .चंद्रकांत रघुवंशी, व्हा. चेअरमन  मनोज रघुवंशी, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. महेंद्र रघुवंशी, राष्ट्रीय सेवा योजना विभागातील सर्व पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राध्यापक प्राध्यापक वृंद यांनी समाधान व्यक्त केले.
बातमी शेअर करा
Previous Post

जिल्हा परिषदेत कर्मचाऱ्यांना स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत स्वच्छतेची शपथ

Next Post

मिशन हायस्कूलमध्ये बक्षीस वितरण कार्यक्रम

Next Post
मिशन हायस्कूलमध्ये बक्षीस वितरण कार्यक्रम

मिशन हायस्कूलमध्ये बक्षीस वितरण कार्यक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ.विजयकुमार गावितांच्या प्रकृतीत सुधारणा; नवसपूर्तीसाठी २२ किलोमीटरची पदयात्रा

डॉ.विजयकुमार गावितांच्या प्रकृतीत सुधारणा; नवसपूर्तीसाठी २२ किलोमीटरची पदयात्रा

November 4, 2026
दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

November 1, 2026
खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

November 1, 2026
सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

November 1, 2026
भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

November 1, 2026
सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

October 31, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add