नंदुरबार l प्रतिनिधी
स्वच्छता ही सेवा या अभियानांतर्गत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी आज सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी यांना स्वच्छतेची शपथ दिली. जिल्हा परिषद प्रशासकीय कार्यालयात दृश्यमन स्वच्छतेसाठी शनिवारी दि. 24 सप्टेंबर2022 रोजी महाश्रमदानाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी गावडे यांनी यावेळी दिली.
स्वच्छता ही सेवा मोहिमेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या या मोगी सभागृहात जिल्हा परिषदेची सर्व विभाग प्रमुख , सर्व गटविकास अधिकारी , कार्यालयीन अधीक्षक यांची बैठक आयोजित करण्यात आली होती .या बैठकीत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार प्रकल्प संचालक राजेंद्र पाटील , उपमुख्य कार्यकारी अधिकारी( ग्रामपंचायत ) आर. एम. पाटील ,उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पा वस्व ) पी . पी . कोकणी , शहादा गटविकास अधिकारी राघवेंद्र घोरपडे नवापूर गटविकास अधिकारी सी. के. माळी , गट विकास सुवर्णा पवार आदी उपस्थित होते.
यावेळी उपस्थिताना मार्गदर्शन करताना मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी सर्व कार्यालय प्रमुख यांनी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत शनिवार दि. 24 सप्टेंबर 2022 रोजी महाश्रमदान कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सदर दिवशी सर्व कर्मचारी यांना उपस्थित राहणे अनिवार्य असून कार्यालय तसेच जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारत परिसराची स्वच्छता करण्यात येणार आहे .तसेच कर्मचारी यांनी आपल्या कार्यालय व परिसराची दृश्यमान स्वच्छता शाश्वत राहील यासाठी स्वतःच्या वर्तमानात बदल करणे आवश्यक आहे .
जिल्हा परिषदेच्या आवारातील सार्वजनिक शौचालय ,मुतारी यांची स्वच्छता राहावी यासाठी प्रयत्नशील राहावे. तंबाखूजन्य पदार्थ खाऊन किंवा धूम्रपान करण्यास प्रशासकीय आवारात बंदी असल्याने कुठेही थुंकू नये .आपण आपल्या घराची ज्याप्रमाणे काळजी घेतो त्याचप्रमाणे प्रशासकीय इमारतींची व कार्यालयांची काळजी घेऊन तेथील वातावरण प्रसन्न ठेवावे असे आवाहनही यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गावडे यांनी केले. यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी गावडे यांनी सर्व उपस्थितांना स्वच्छतेची शपथ दिली .








