नंदुरबार l
धुळे-सुरत महामार्गावर जनावरांची निर्दयतेने कोंबून अवैध वाहतूक करतांना आढळून आल्याने वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, धुळे-सुरत महामार्ग क्र.६ वर एका पेट्रोल पंपासमोर एका वाहन चालकाने त्याच्या ताब्यातील वाहनात (क्र.एम.एच.४१ जी १६२४) निर्दयतेने जनावरांची कोंबून अवैध वाहतूक करतांना आढळून आला. पोलिसांनी ४१ हजार रुपये किंमतीचे सात जनावरांची सुटका केली असून वाहन चालक वाहन सोडून पसार झाला.
याबाबत मोहित परमेश्वर अग्रवाल यांच्या फिर्यादीवरुन विसरवाडी पोलिस ठाण्यात वाहन चालकाविरोधात प्राण्यांना क्रूरतेने वागणूक देण्यास प्रतिबंध अधिनियम ११ (घ), (ड), (च), सह प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ (२०१५ चे सुधारणेसह) कलम ५, ५ (अ) ५ (ब), ९, ९ (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.अरुण कोकणी करीत आहेत.








