शहादा l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींचा निवडणूका झाल्यानंतर आज मतमोजणी झाली
यात भाजपाने 74 पैकी 58 , काँग्रेसने ३५, राष्ट्रवादी ५ तर शिवसेना दोन ग्रामपंचायतीवर दावा केला आहे.
आ. राजेश पाडवी यांचा दावा
शहादा तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींचा निवडणूका झाल्या त्यात शहादा मतदारसंघात ५२ ग्रामपंचायतच्या समावेश होता पैकी ४२ ग्रामपंचायतींवर भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश मिळाले असल्याचे आ. राजेश पाडवी यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे .
शहादा मतदार संघ दोन तालुक्यात विभागला असून तालुक्यातील जनतेला दोन आमदार लाभले आहेत. त्यात शहादा तळोदा मतदारसंघातील आमदार राजेश पाडवी यांचा मतदार संघातील ५२ पैकी ४२ ग्रामपंचायतीवर भाजपाच्या झेंडा फडकला असून आमदार राजेश पाडवी व दिपक पाटील यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा जनतेने विश्वास दाखवला असल्याचे नमूद केले आहे. भाजपा जिल्हा अध्यक्ष विजय चौधरी, आमदार राजेश पाडवी, भाजपा नेते सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील यांचा नेतृत्वात लोणखेडा, डोगरगाव,तिखोरा, अलखेड, वडछिल, मंदाणे,भुलाणे, होळ उंटावद, टेंभली, शोभा नगर, भोंगरे, वडगाव ,भागापूर, मडकाणी, जावदे त.बो., नांदे, जवखेडा,फत्तेपुर, अंबापुर,कन्साई, दुधखेडा, टुकी, अमोदे, खेडदिगर, मुबारकपुर, पिपर्डा, कोचरा,पिप्राणी,रायखेड, इस्लामपूर, जावदे त.ह., लोहारे, कुरंगी,बुडीगव्हाण, चिरडे,खरगोन, तलावडी, शहाणा या गावाचे लोकनियुक्त संरपंच व सदस्य निवडुन आले तर चार ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. पुरुषोत्तम नगर, मोहिदा त.ह., सावखेडा, मानमोड्या या सर्व संरपंच व सदस्य यांच्या सत्कार करुन अभिनंदन केले.
काँग्रेसच्या प्रभारी हेमलता शितोळे यांचा दावा
शहादा तालुक्यात झालेल्या ७४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने ३५ ग्रामपंचायतींवर घवघवीत यश मिळविल्याचे जिल्हा परिषदेच्या सदस्या तथा शहर काँग्रेसच्या प्रभारी हेमलता शितोळे यांनी केला आहे.
तालुक्यात काँग्रेसने दावा केलेल्या ग्रामपंचायती अश्या : रायखेड, सुलवाडा, टवळाई, मुबारकपूर ,दुधखेडा,चांदसैली,लंगडी भवानी, मलगांव,जावदे त. बो., औरंगपूर, करणखेडा,तलावडी,फत्तेपुर, रामपूर, मडकानी,धुरखेडा, आमोदा, सटीपानी,चिखली बु., कानडी त. ह., भुते आकसपूर, वडगांव, चिरडे, कोंढावळ, लोहारा, होळ उंटावद, वडछील,चिरखान अशा एकूण ३५ ग्रामपंचायतींवर सत्ता प्रस्थापित केल्याचे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
58 ग्रामपंचायतींवर भाजपाचा दावा
शहादा तालुक्यात सोमवारी झालेल्या मतमोजणीनंतर तालुक्यातील 68 पैकी 52 ग्रामपंचायतींवर भारतीय जनता पार्टीची सत्ता स्थापन झाल्याची यापूर्वी सहा ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.तर निकालाअंती एकूण 74 पैकी 58 ग्रामपंचायती भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आल्या आहेत. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून आलेल्या ग्रामपंचायतीत तिखोरा, अलखेड, वडाळी, मंदाने,त-हाडी त.बो.,भुलाने, होळ उंटावर, पिंगाणे,टेंबली, शोभानगर, भोंगरे, औरंगपूर, वडगाव, भागापूर ,मडकानी, जावदे तबो, नांदे ,फत्तेपूर, अंबापूर, कनसाई, कोंडावळ, दुधखेडा, टुकी, आमोदे, खेडदिगर ,मुबारकपूर ,भादे, कहाटूळ, पिंपर्डे,
कोचरा ,पिंपराणी, रायखेड, इस्लामपूर, जावदे तह, लोहारे, कुरंगी, बुडीगव्हाण, चिरडे ,खरगोन, ओझरटा, पळसवाडा, शहाणा,कवठळ तश., भुते आकसपूर, प्रकाशा ,डोंगरगाव, लोणखेडा, नांदेर्डे ,काथर्दे खु.,काथर्दे दि, करणखेडा, टवळाई.
बिनविरोध ग्रामपंचायत- पुरुषोत्तम नगर, मोहिदे तह, सावखेडा, मानमोडे, काकर्दे खु.
अशा तालुक्यातील एकूण 58 ग्रामपंचायतीवर भारतीय जनता पार्टीची सत्ता स्थापन झाली असून खा. डॉ. हिना गावित, ना.डॉ. विजयकुमार गावित (आदिवासी विकास मंत्री) आ. राजेश पाडवी, भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य दीपक पाटील, जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष प्रा.मकरंद पाटील आदिंच्या मार्गदर्शनाखाली चुरशीच्या लढतीत ग्राम पंचायत सरपंच व सदस्य निवडून आले आहेत.अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील पाटील यांनी दिली आहे.








