नंदूरबार l प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने शहादा तालुक्यात चांगले प्रदर्शन करीत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या जवखेडा व परीवर्धा ग्रामपंचायतीत वर्चस्व मिळवले आहे . जवखेडा येथे राष्ट्रवादीच्या सौ . एकता मणिलाल सुर्यवंशी यांच्यासह सर्व पॅनल विजय झाले तर परिवर्धा येथे राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य मोहन शेवाळे यांच्या धर्मपत्नी सपना मोहन शेवाळे विजय झाल्या .

रायखेड ग्रामपंचायतीत संपुर्ण पॅनलसह राष्ट्रवादीचे कैलास ठाकरे सरपंच पदी विजयी झाले . तर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी बुकल्या ठाकरे हे चिरडे ग्रामपंचायतीत सरपंच म्हणुन निवडुन आले आहेत . भुलाने ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सरपंच संपुर्ण पॅनलसह निवडुन आले आहेत .
नंदुरबार तालुक्यातील वाघोदा ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी आदिवासी सेलचे जिल्हाध्यक्ष गुलाब आखाड्या नाईक यांच्या नेतृत्वातील पॅनलने निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे. असे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.








