Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अवमानकारक वक्तव्याचा मराठा समाजाकडून निषेध

team by team
September 19, 2022
in क्राईम
0
अवमानकारक वक्तव्याचा मराठा समाजाकडून निषेध
तळोदा  l  प्रतिनिधी
 जळगाव पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी मराठा समाजाबद्दल अतिशय घाणेरडे व आक्षेपार्ह वक्तव्य केले. यामुळे तळोदा तालुक्यातील मराठा समाजातर्फे नायब तहसीलदार  पी.आर ससे व ना.त. शैलेंद्र गवते यांना निवेदन देऊन सदरील व्यक्तीस कायमस्वरूपी बडतर्फ करून, कायदेशीर गुन्हा नोंदविण्याची मागणी निवेदनात केली आहे.
 समाजाबद्दल अवमानकारक ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली असून, एका पोलीस निरीक्षक अशा महत्त्वाच्या व प्रतिष्ठेच्या पदावर नियुक्त असताना एखादा समाजाबद्दल जाणीवपूर्वक बेताल वक्तव्य करून संपूर्ण मराठा समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्या अनुषंगाने अशा जातीयवादी प्रवृत्तीच्या अधिकाऱ्याचे तात्काळ निलंबन होऊन, त्यास पोलीस खात्यातून कायमचे बडतर्फ करण्यात यावे व त्याची सर्व चौकशी करावी अशी मागणी तळोदा तालुक्यातील सर्व मराठा समाजाच्या वतीने या निवेदनाद्वारे केली आहे.
पोलीस अधिकारी किरणकुमार बकाले यांनी ऑडिओ क्लिप मध्ये केलेल्या वाक्यप्रयोग पाहता या ठिकाणी नुसती मराठा समाजाची नव्हे तर मराठा समाजाच्या माता-भगिनी बद्दल अतिशय घाणेरडे शब्द वापरून त्यांच्या घोर अपमान केलेला आहे. तसेच त्यांनी केलेला हा गुन्हा हे प्रकारे विनयभंगाच्या असून त्यांच्या विनयभंगाच्या कायद्यानुसार गुन्हा दाखल करून कायमस्वरूपी पोलीस खात्यातून बडतर्फ करणेबाबतचे आदेश तातडीने पारित करण्यात यावे तसे सदरच्या संदेश आपल्या प्रशासकीय स्तरावरून आपण तातडीने तुमच्याद्वारे मराठा समाजाच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवाव्यात अन्यथा मराठा समाज शांत बसणार नाही वेळ प्रसंगी तीव्र स्वरूपाचे जन आंदोलन ही करेल व त्याची सर्वस्वी जबाबदारी राज्य शासनाची व संबंधित प्रशासनाचीच राहिल्याचे निवेदनात नमूद केले आहे.
निवेदनावर मराठा समाजाचे अध्यक्ष नवनीत शिंदे, ताराचंद शिंदे, सुधीर शिंदे, अशोक चव्हाण, रमेश मराठे, नितिन शिंदे, देवकृष्ण चव्हाण, मोहन पवार (वकील), महेंद्र गाडे, धनराज मराठे, सुभाष शिंदे, शांताराम गायकवाड, राजेंद्र मोगल, नितिन गागरे, अभिमन्यु मराठे, अविनाश शिंदे इत्यादी समाज बांधवांच्या सह्या आहेत.
बातमी शेअर करा
Previous Post

आमदार राजेश पाडवी तापी जिल्हा निवडणूक प्रभारी

Next Post

लम्पी रोगाबाबत समाज माध्यमांमधून अफवा पसरविऱ्‍यांवर कठोर कारवाई

Next Post
लम्पी स्कीन प्रतिबंधासाठी लसीकरण करून घेण्याचे आवाहन

लम्पी रोगाबाबत समाज माध्यमांमधून अफवा पसरविऱ्‍यांवर कठोर कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add