शहादा l प्रतिनिधी
परिसराचे भाग्यविधाते, शिक्षण व सहकार महर्षी, स्वातंत्र्य सेनानी, स्वर्गीय अण्णासाहेब पी.के. पाटील यांच्या आठवे पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमास शहादा तालुका, नंदुरबार जिल्हा तसेच गुजरात व मध्य प्रदेशच्या सिमावर्ती भागातील समाजबांधवांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावत स्मृतीस्थळी अभिवादन केले.

पूज्य साने गुरूजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील, सचिव श्रीमती कमलताई पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या अभिवादन प्रसंगी माजी पंचायत समिती सभापती माधव जंगू पाटील, तालुका दूध संघाचे चेअरमन उध्दव रामदास पाटील,माजी समाज कल्याण सभापती दिलीप बागले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनीलभाई पाटील, उपसभापती रविंद्र रावल, खरेदी विक्री संघाचे चेअरमन राजाराम पाटील,व्हाईस चेअरमन जगदीश पाटील, पूज्य साने गुरूजी विद्या प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष जगदीश पाटील, संचालक रमाकांत पाटील, माजी चेअरमन विजय पाटील,माजी नगराध्यक्ष विजय पाटील,
माजी उपनगराध्यक्ष अरविंद कुवर, माजी नगरसेवक के.डी.पाटील,सुपडू खेडकर, संजय चौधरी, राकेश पाटील, जयप्रकाश पाटील, यशवंत पाटील, यशवंत चौधरी, कल्पेश पटेल,ललीत छाजेड,भरत ओस्तवाल, प्राचार्य डॉ.विश्वासराव पाटील, ॲड.गोविंद पाटील, ॲड.प्रमोद पटेल, प्राचार्य महेमूद खाटीक आदिंसह विविध सहकारी,समाजसेवी संस्थांचे पदाधिकारी, मंडळ संचलित विविध विद्या शाखांचे प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विविध पक्षांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावत स्मृतीस्थळी अभिवादन केले.
दरम्यान,पूज्य साने गुरूजी विद्या प्रसारक मंडळ प्रशासकीय इमारतीसमोरील स्मृतीस्थळी तसेच लोणखेडा चौफुलीवरील ‘प्रेरक शक्तीचा पुतळा’येथे सकाळी सात वाजेपासून अभिवादन करण्यात आले.मंडळाचे
शैक्षणिक व प्रशासकीय समन्वयक प्रा.मकरंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे संयोजन करण्यात आले.








