नंदुरबार l प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या धुळे विभागाकडून तीर्थक्षेत्र व पर्यटन क्षेत्र भेट देण्याकरिता प्रवाशांच्या आग्रहास्तव उद्या शुक्रवार 16 सप्टेंबर रोजी नंदुरबार आगारातून अष्टविनायक दर्शन बस सेवा रवाना होणार आहे.नंदुरबार जिल्ह्यातील भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन आगारप्रमुख मनोज पवार यांनी केले आहे.
अष्टविनायक दर्शन सेवेत श्रीक्षेत्र शिर्डी, अष्टविनायक दर्शन, श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर, श्रीक्षेत्र देवगड, श्री गुरुदत्त मंदिर पॅकेज टूर जाहीर करण्यात आला आहे. दि. 16 सप्टेंबर रोजी नंदुरबार आगारातर्फे सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे भाविकांनी या सुविधेचा लाभ घेऊन जास्तीत जास्त संख्येने आणि ग्रामीण भागातून ग्रुप पद्धतीने प्रवासी उपलब्ध झाल्यास एसटीच्या उपक्रमांतर्गत धार्मिक स्थळांना भेटी देता येणार आहेत.याकरिता प्रवाशांनी नंदुरबार आगारात हितेश चौधरी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आगार प्रमुख मनोज पवार यांनी केले आहे








