Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शहाद्यात रंगला अनोखा गझल मुशायरा श्रोत्यांना मराठी उर्दू गझलांची मेजवानी

team by team
September 15, 2022
in राज्य
0
शहाद्यात रंगला अनोखा गझल मुशायरा श्रोत्यांना मराठी उर्दू गझलांची मेजवानी
शहादा  l
शहादा येथील पटेल रेसिडेन्सी सभागृहात साहित्य क्षेत्रातील पहिला व ऐतिहासिक उर्दू मराठी गझल मुशायरा रंगला. रसिक श्रोते आणि गझलकार यांच्या साद प्रतिसादाने ही साहित्य पर्वणी अनोखी ठरली.गझल मंथन साहित्य संस्था नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने या विशेष मुशाय-याचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नामांकित मराठी उर्दू गझलकार एजाज शेख (भुसावळ) उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून प्रांताधिकारी डॉ. चेतन गिरासे, तहसीलदार व गझल गायक डॉ. मिलिंद कुलकर्णी, उद्योजक शरद पाटील, उद्योजक नूहभाई नुरानी, उद्योजक कल्पेश पटेल आदींची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते सुरेश भट यांच्या प्रतिमेचे व देवता पूजन, दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला.
यानंतर गझल मंथन संस्था मुशायरा समितीचे उपाध्यक्ष गझलकार विष्णू जोंधळे, राज्य प्रसिद्धीप्रमुख गझलकार भरत माळी, खान्देश विभाग प्रमुख गझलकारा हेमलता पाटील, अलका जोंधळे, अरूण राठोड, रविंद्र जमादार यांच्या हस्ते मान्यवरांसह गझलकारांचा सन्मान करण्यात आला. ज्येष्ठ गझलकार अफजल मन्सूरी, शब्बीर राही मालेगावी यांच्या खास ऊर्दू रिवाजातील गझलांनी जाणकारांचे लक्ष वेधले.
यानंतर गझलकार संजय गोरडे, गझलकार राज शेळके गझलकार प्रमोद राठोड, गझलकार  राहूल कुलकर्णी,  धुळे जिल्हाध्यक्षा गझलकारा अनिता खैरनार, यांनी सादर केलेल्या दर्जेदार मराठी गझल रसिकांची दाद मिळवली. गझलकार प्राचार्य शिवाजीराव साळुंखे यांच्या तरन्नुममधील गझल, ज्येष्ठ गझलकारा हेमलता पाटील यांच्या मराठी आणि उर्दू गझल, गझलकार संदीप पाटील यांच्या मराठी आणि उर्दू गझल, गझलकार आकाश कंकाळ याच्या मिश्र द्विभाषिक गझल आणि गझल मुशाय-याचे अध्यक्ष एजाज शेख यांच्या मराठी उर्दू गझलांनी सभागृह जिंकले.
कार्यक्रमाच्या प्रथम सत्राचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन विष्णू जोंधळे यांनी केले. तर गझल मुशाय-याचे बहारदार सुत्रसंचालन आकाश कंकाळ यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी हेमलता पाटील, शरद पाटील, कल्पेशभाई पटेल, नुहभाई नुरानी, अलका जोंधळे, सुकेशीनी पानपाटील, कुणाल शिरोडे, गोरख वाल्हे यांनी सहकार्य केले.
बातमी शेअर करा
Previous Post

एस.ए.मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे हिंदी दिवस साजरा

Next Post

अष्टविनायक दर्शनासाठी नंदुरबार आगारातर्फे उद्या बस जाणार  

Next Post
अष्टविनायक दर्शनासाठी नंदुरबार आगारातर्फे उद्या बस जाणार  

अष्टविनायक दर्शनासाठी नंदुरबार आगारातर्फे उद्या बस जाणार  

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026
अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

April 25, 2026
महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना  महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

April 25, 2026
दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

April 25, 2026
मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add