नंदुरबार l
एस. ए.मिनिस्ट्रीज ट्रस्ट,नंदुरबार संचलित एस.ए.मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे हिंदी दिवस साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्राचार्य नूतनवर्षा वळवी यांनी विद्यार्थ्यांना हिंदी दिवसाच्या शुभेच्छा देत,पर्यवेक्षिका वंदना जांबिलसा यांनी हिंदी दिवसाचे महत्व सांगितले त्यानंतर शाळेत विविध उपक्रमांच्या माध्यमातून निबंध स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, ग्रीटिंग कार्ड्स स्पर्धा घेण्यात आल्या ह्या वेळी विविध कालखंडातील हिंदी भाषेतील प्रसिद्ध साहित्यिक व कवींची सचित्र माहिती पोस्टर मध्ये प्रदर्शित करण्यात आली.
विद्यार्थ्यांनी देखील ह्या उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील हिंदी विषय शिक्षक वंदना जांबिलसा, मनिष पाडवी,रुचिता सुतार,जयश्री कदम,चारुलता चव्हाण,शिल्पा वळवी,रोझलीन यंगड,खुशाल शर्मा यांनी परिश्रम घेतले,ह्या कार्यक्रमास शाळेतील उपमुख्याध्यापक विजय पवार, पर्यवेक्षिका वंदना जांबिलसा, पर्यवेक्षक मिनल वळवी,ज्येष्ठ शिक्षक अविनाश सोनेरी आदी उपस्थित होते.








