नंदुरबार l
अक्कलकुवा तालुक्यातील सल्लीबारचा बोरीवलपाडा येथे शेती हिस्से वाटणीच्या वादातून दाम्पत्यास मारहाण केल्याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, अक्कलकुवा तालुक्यातील सल्लीबारचा बोरीवलपाडा येथील धर्मा गिबा वळवी व गोविंद ठाणसिंग वसावे यांच्यात शेती हिस्से वाटणीतून वाद झाला. या वादातून धर्मा वळवी यांना गोविंद ठाणसिंग वसावे, ठाणगिं गुलब्या वसावे, जुनाबाई ठाणसिंग वसावे, गणपत ठाणसिंग वसावे यांनी हाताबुक्यांनी मारहाण केली.
तसेच शेवंतीबाई धर्मा वळवी यांचाही हात पिळून काठीने मारहाण करुन गंभीर दुखापत केली. शिवीगाळ व जिवेठार मारण्याची धमकी दिली. याबाबत शेवंतीबाई धर्मा वळवी यांच्या फिर्यादीवरुन मोलगी पोलिस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.दीपक बुनकर करीत आहेत.








