नंदुरबार l प्रतिनिधी
पितृपक्षात भागवत कथेचे विशेष महत्त्व आहे.याच पंधरवड्यात बिहार मधील गया येथे भव्ययात्रा भरते.तेथील फाल्गुनीगंगा प्रवाहित होत असते.नंदनगरीची पातळगंगा प्रमाणेच या नदीवर भाविकांचा उत्साह असतो..कलियुगातील प्रादुर्भाव बाजूला करण्यासाठी भजन कीर्तन सर्वोत्तम पर्याय आहे. कथा भक्तीचे स्वरूप भक्तीयुक्त ज्ञानाचा यज्ञ म्हणजे भागवत सप्ताह असल्याचे प्रतिपादन वेदमूर्ती अविनाश जोशी महाराज यांनी केले.
शहरातील गवळीवाडा परिसरात भदाणे परिवारातर्फे श्रीमद् भागवत ज्ञान यज्ञ कथेचे आयोजन करण्यात आले आहे.बुधवारी सकाळी मोठा मारुती मंदिरापासून श्रीमद् भागवत ग्रंथ शोभायात्रा काढण्यात आली.भक्ती गीतांनी तल्लीन होऊन भाविक शोभा यात्रेत सहभागी झाले होते. पहिल्या दिवशी कथेचे निरूपण करताना अविनाश जोशी म्हणाले की, सैरावैरा धावणारे मन एकाग्र करून मनाची एकाग्रता करण्यासाठी श्रीमद् भागवत कथा ऐकणे महत्त्वाचे ठरते.असेही जोशी म्हणाले.
श्रीमद् भागवत कथेत तबलावादक मुकेश पाटील, हार्मोनियम आनंद कदमबांडे, बँजो मास्टर शिवम राठोड, गीतकार अनिरुद्ध जोशी तसेच विलास जोशी, राजू जोशी यांचे सहकार्य लाभत आहे.
रविवार दि.18 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता श्रीकृष्ण जन्मोत्सव होईल तसेच मंगळवार दि.20 सप्टेंबर रोजी श्रीमद् भागवत कथा सांगतानिमित्त महाप्रसाद सकाळी 9 ते 12 दरम्यान वाटप होईल.भाविकांनी कथेसह महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन संयोजक समस्त भदाणे परिवारातर्फे करण्यात आले आहे.








