Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

लोकप्रतिनिधींकडून शिक्षकांची समाजात प्रतिमा मलिन करण्याचे षडयंत्र थांबवावे अन्यथा महाराष्ट्रात याचे गंभीर परिणाम होतील : मधुकरराव उन्हाळे

team by team
September 12, 2022
in राज्य
0
लोकप्रतिनिधींकडून शिक्षकांची समाजात प्रतिमा मलिन करण्याचे षडयंत्र थांबवावे अन्यथा महाराष्ट्रात याचे गंभीर परिणाम होतील : मधुकरराव उन्हाळे

नंदुरबार  l   

 

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद (प्राथमिक विभाग) नंदुरबार शाखेच्यावतीने जिल्हास्तरीय शिक्षक संपर्क मेळावा व जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन १० सप्टेंबर २०२२ रोजी  नंदुरबार शहरातील गिरीविहार गेट जवळील इंदिरा मंगल कार्यालय येथे शिक्षक परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष मधुकरराव उन्हाळे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. काही लोकप्रतिनिधी जाणीवपूर्वक द्वेष भावनेतून शिक्षकांची समाजातील असलेली प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करत असून या बाबीचे आगामी कालावधीमध्ये गंभीर परिणाम उद्भवतील असे सांगून शिक्षक 152 प्रकारचे विविध कार्य करत करीत अध्ययन अध्यापनाचे कार्य करीत असताना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहेत,यावेळी त्यांनी नाव न घेता  राज्यात काही लोकप्रतिनिधीकडून शिक्षकांची समाजात प्रतिमा मलीन करण्यात येत आहे ते त्वरित थांबवावे अन्यथा याचे तीव्र पडसाद उमटतील असा इशारा अध्यक्ष मधुकरराव उन्हाळे यांनी याप्रसंगी दिला.

 

 

 

याप्रसंगी जिल्ह्यातील दहा शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने मान्यवरांच्या सन्मानित करण्यात आले मुख्य वक्ते म्हणून अखिल भरतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाचे राष्ट्रीय अतिरिक्त महामंत्री श्री संजयकुमार राऊत (मध्य प्रदेश) यांची उपस्थिती लाभली. माजी मंत्री तथा  शिंदखेडा विधानसभेचे विद्यमान आमदार जयकुमार रावल यांनी शिक्षक परिषदेच्या पाठीशी सातत्याने उभा राहील शिक्षकांच्या प्रश्नासंदर्भात आगामी कालावधीत मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात येईल असे सूतोवाच केले.

 

 

 

नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक  पी.आर.पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की शिक्षक 152 प्रकारची काम करून अध्यापन करीत असतो हे पहिल्यांदाच समजले यापूर्वी पोलिसांनाच खूप कामे आहेत असे आम्हास वाटत होते.परंतु या गुरुजनांच्या कार्याचे कौतुक करतो असे प्रतिपादन केले. प.खा.भिल्ल सेवा मंडळचे अध्यक्ष सुहास नटावदकर  यांनी आपल्या मनोगतात शिक्षक परिषदेचे वटवृक्षात रूपांतर झाल्याचे सांगितले,आदिवासी देवमोगरा एज्युकेशन सोसायटी चे चेयरमन राजेंद्रकुमार गावीत यांनी शिक्षक परिषदेच्या विशाल संघटन शक्ती बद्दल कौतुक केले.

 

 

 

याप्रसंगी आदर्श शैक्षणिक संस्था धुळे अध्यक्ष धनराज विसपुते, यांनी शिक्षक परिषदेच्या कार्याचे कौतुक करून शुभेच्छा देऊन आपले मनोगत व्यक्त केले. शिक्षक परिषदेचे राज्य कोषाध्यक्ष पुरुषोत्तम काळे , नाशिक विभागीय अध्यक्ष राजेंद्र जायभाये, नाशिक विभागीय कार्यवाह रामकृष्ण बागल, नाशिक विभागीय उपाध्यक्ष राकेश आव्हाड , सदस्य आबा बच्छाव, राज्य उपाध्यक्ष अविनाश तालापल्लीवार, राज्य कार्याध्यक्ष बाबुराव पवार, राज्य कार्याध्यक्ष बाबुराव गाडेकर,

 

 

राज्य संपर्कप्रमुख राजेंद्र नांद्रे, मराठवाडा विभागीय अध्यक्ष संजय कोठाळे,लातूर जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र गुरमे,राज्य उपाध्यक्ष सुनील केणे अमरावती जिल्हा कार्यवाह रवी घवळे जिल्हा उपाध्यक्ष शैलेश चौकसे  गडचिरोली जिल्हाध्यक्ष विजय साळवे ,जालना जिल्हाध्यक्ष मंगेश जैवाल, जालना जिल्हा कार्यवाह  विकास पोथरे नांदेड जिल्हाध्यक्ष दत्तप्रसाद पांडागळे, नांदेड जिल्हा कार्यवाह दिगंबरराव कुरे  पाटील, जळगाव जिल्हाध्यक्ष भिकाभाऊ सपकाळे, नाशिक विभागीय  कार्याध्यक्ष भूषण चौधरी,

 

 

 

धुळे व नंदुरबार जिल्हा प्राथमिक शिक्षक पतसंस्था गटनेते रवींद्र खैरनार, संचालक रवींद्र बोरसे ,संचालक पुखराज पाटील, जितेंद्र वळवी ,दिनेश पाडवी, शिक्षक संघ धुळे जिल्हाध्यक्ष गमन पाटील ,जिल्हाध्यक्ष शिवाजी संघटना थोरात गट सतीश पाटील ,जिल्हाध्यक्ष प्रहार संघटना योगेश धात्रक,  साक्री तालुका समन्वय समिती अध्यक्ष विनोद पाटील, धुळे जिल्हा कार्यवाह रुपेश जैन, संचालक प्रकाश बच्छाव ,चंद्रशेखर पाटील वसंत गावित ,शिक्षक सेना नंदुरबार जिल्हाध्यक्ष भरत सावंत,  जुनी पेन्शन हक्क संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप रायते प्राथमिक शिक्षक संघ धुळे राजेंद्र भदाणे,शिक्षक समिती धुळे जिल्हा कार्याध्यक्ष  मनोज निकम  जिल्हा समन्वय समिती धुळे कोषाध्यक्ष ज्ञानेश्वर बाविस्कर ,राज्य कोषाध्यक्ष कमल पावरा, जिल्हा अध्यक्ष महिला संघटना उज्वला पाटील , नंदुरबार जिल्हाध्यक्ष नितेंद्र चौधरी,जिल्ह्यातील शिक्षक परिषदेचे  पदाधिकारी ,जिल्ह्यातील शिक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

आदर्श शिक्षक पुरस्कार  शिक्षक परिषदेतर्फे नंदुरबार जिल्ह्यातील या  दहा शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला. यात  सुनंदा भिकन ठाकरे (जि.प.शाळा जोगणीपाडा, ता.नंदुरबार),  मनिषा प्रकाश जाधव (जि.प.शाळा, तारपाडा ता.नवापूर), कविता शिवाजी देसाई (जि.प.शाळा शिरुड दिगर, ता.शहादा), जेमलाल गुजर्‍या पाडवी (जि.प.शाळा गणेश बुधावल, ता.तळोदा), सुरूपसिंग कर्मा वसावे (जि.प.शाळा उमरपाडा ता.अक्कलकुवा),  शकुंतला वेस्ता ढोलार (जि.प.शाळा मानसिंगपाडा, ता.धडगाव), नितेश सत्तरसिंग वळवी (जि.प.शाळा निंबीपाडा, मोलगी भाग), भावनाबेन भगुभाई पटेल (जि.प.गुजराती मुली, नवापूर),  शायना बी जमील अहमद (जि.प.उर्दू शाळा राजमोही, ता.अक्कलकुवा), शिरीष राजाराम पवार (सावित्रीबाई फुले नगरपालिका शाळा क्र.४, नंदुरबार) यांना अध्यक्ष व मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला.

 

 

सामाजिक जाणिवेतून कार्य करणारे नंदुरबार जिल्ह्याचे कार्य तत्पर जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी धडगाव येथील अतिदुर्गम भागातील कालेखेतपाडा या शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यात अडचण निर्माण होत असताना पोलिसांच्या लोकसहभागातून लोखंडी फुल उपलब्ध करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासात येणाऱ्या अडचणींवर मात करून सामाजिक भान जागृत ठेवून सहकार्य केल्याबद्दल शिक्षक परिषदेच्या वतीने विशेष सन्मान याप्रसंगी करण्यात आला.

 

 

नाशिक विभागीय उपाध्यक्ष राकेश आव्हाड यांनी प्रास्ताविकात शिक्षक परिषदेने सोडवलेल्या विविध प्रश्नांचा मागोवा मांडला तसेच  यंदाच्या वर्षांपासून गुजराथी , उर्दु ,व नगरपालिका विभागातील  शिक्षकांना ही आदर्श शिक्षक  पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मेळाव्यात शैक्षणिक विषयावर तसेच जिल्ह्यातील शिक्षक बंधू भगिनींच्या समस्यांवर चर्चा करून भविष्यातील वाटचाल ठरविण्यात आली. राज्य कोषाध्यक्ष पुरुषोत्तम काळे यांनी आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झालेल्या कर्तुत्ववान, उपक्रमशील शिक्षक बांधवांना त्यांनी जिल्ह्याच्या शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच  पुरस्कारांसाठी शिक्षक बांधवांकडून कोणत्याही प्रकारचे प्रस्ताव अथवा शुल्क न आकारता केंद्रप्रमुखांनी आणि केंद्रातील शिक्षक बंधू भगिनींनी दिलेल्या अभिप्रायानुसार गुणवंत शिक्षकांची स्तुत्य निवड करण्यात आली असल्याचे स्पष्ट केले.

 

 

आबा बच्छाव यांना विभागीय संपर्कप्रमुख म्हणून जबाबदारी घोषित करण्यात आली, तर विभागीय कार्यवाह रामकृष्ण बागल यांनी शिक्षक परिषदेवर प्रेम करून शिक्षक परिषदेचे हितचिंतक  भास्करराव नेरे,अरुण भामरे  ,बिरबल पाडवी, शशिकांत कृष्णा राऊत , समाधान मधुकर पाटील  , सुनील रडत्याभाई मावची ,गणेश जहांगीर पावरा  आदी शिक्षकांनी जाहीर प्रवेश दिला .

 

 

यावेळी शिक्षक परिषदेतर्फे शिक्षकांना शैक्षणिक माहिती होण्यासाठी मेळाव्यास शैक्षणिक साहित्य स्टॉल लावण्यात आला होता यासाठी केंद्रप्रमुख ललिता भामरे यांनी खास मेहनत घेतली व सहकार्य केले त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

 

 

कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन जिल्हा सहकार्यवाह अशोक  बागले यांनी केले तर उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार जिल्हा कार्यवाह किरण घरटे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हाध्यक्ष नितेंद्र चौधरी ,देवेंद्र बोरसे, शरद घुगे, प्रकाश बोरसे, दिनेश मोरे ,धनंजय सूर्यवंशी ,हिरालाल पाटील, रावसाहेब बावा, भाऊराव कोकणी, किशोर ठाकरे  ,भगवान मोरे, नामदेव तडवी ,जगदीश पाटील,संदीप काकुस्ते, हरिश्चंद्र नाईक, कृष्णा वळवी,जगदीश भागवत,अमोल पाटील, मनोजकुमार चौधरी, गणेश अचिंतलवार,राहुल वंजारी,मदन मुंडे, लोटन बाविस्कर, नितीन पाटील, जितेंद्र महाले,विनय नेरकर,

 

 

 

 

अनिल माळी,सिताराम भोई ,सुनील सोनवणे, बालाजी लालोंडे, दीपक खैरनार,सचिन बागुल , अहिरे,किरण पाटील,भिकन पिंजारी, सिद्धार्थ बैसाने, रामू कोकणी,मानसिंग पाडवी, भिका पावरा, विलास तडवी, रमाकांत कुलकर्णी,संजय साळी,योगेश महाले, रणधीर भामरे ,भाऊसाहेब जाधव ,रामदास पावरा ,जात्र्या वसावे, महिला आघाडी अध्यक्षा चेतना चावडा ,सरिता काळे, दीपमाला बागल,भारती रनाळकर ,वैशाली घुगे, चेतना तावडे, रोहिणी पवार,लक्ष्मी देवरे,सुवर्णा पाटील,शुभांगी चौधरी,गायत्री पाडवी,रेखा पाटील, शितल शिंदे,सॅलविना कुवर,मीनल लोखंडे आदींनी परिश्रम घेतले.शिक्षक संपर्क मेळाव्यास जिल्ह्यातील जिल्हा परिषद ,नगरपालिका अंतर्गत कार्यरत मराठी ,गुजराथी ,उर्दू माध्यमांच्या शाळांचे शिक्षक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबारला ब्राह्मण समाजातर्फे आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार

Next Post

प्राण्यांमधील संक्रमक व सांसर्गिक रोगाची माहिती पशुसंवर्धन विभागास देणे बंधनकारक

Next Post
प्राण्यांमधील संक्रमक व सांसर्गिक रोगाची माहिती पशुसंवर्धन विभागास देणे बंधनकारक

प्राण्यांमधील संक्रमक व सांसर्गिक रोगाची माहिती पशुसंवर्धन विभागास देणे बंधनकारक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्याच्या सार्थक पाटीलला रोबोटिक्स ऑलिंपियाडमध्ये सुवर्णपदक

शहाद्याच्या सार्थक पाटीलला रोबोटिक्स ऑलिंपियाडमध्ये सुवर्णपदक

January 22, 2026
शाश्वत शेतीसाठी जैविक कीड नियंत्रण काळाची गरज; नंदुरबार कृषी महाविद्यालयात प्रशिक्षण

शाश्वत शेतीसाठी जैविक कीड नियंत्रण काळाची गरज; नंदुरबार कृषी महाविद्यालयात प्रशिक्षण

January 22, 2026
अविश्वास प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी, 27 जानेवारीला विशेष ग्रामसभेचे आयोजन

अविश्वास प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी, 27 जानेवारीला विशेष ग्रामसभेचे आयोजन

January 22, 2026
सहकार आयुक्त दिपक तावरे यांनी केली, पतसंस्थांच्या संगणकीकरणाच्या कामाची पाहणी

सहकार आयुक्त दिपक तावरे यांनी केली, पतसंस्थांच्या संगणकीकरणाच्या कामाची पाहणी

January 22, 2026
नंदुरबार जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा दिमाखदार समारोप; विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक प्रतिभेचा गौरव

नंदुरबार जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा दिमाखदार समारोप; विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक प्रतिभेचा गौरव

January 22, 2026
हिंदुत्वाचे सैनिक बनून संघटित व्हा आणि हिंदू मतांची वोट बँक स्थापन करा :  कालीचरण महाराज

हिंदुत्वाचे सैनिक बनून संघटित व्हा आणि हिंदू मतांची वोट बँक स्थापन करा : कालीचरण महाराज

January 22, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add