नंदुरबार l
अधिवक्ता परिषद स्थापना दिवसाचे औचित्या साधुन देवगिरी प्रांताच्या नंदुरबार अधिवक्ता परिषदेचा कार्यक्रम झाला. यावेळी हल्लीची पिढी ही आभ्यासु असुन तंत्रज्ञानाच्या आधारे उत्तम मांडणी करणारी असुन ते आपला ठसा देखील उमटवत असल्याचे मत यावेळी जेष्ठ विधीतज्ञांनी व्यक्त केले.
नंदुरबारमध्ये चांगले अधिवक्ता घडावे. यातुन चांगल्या उपक्रमातून विविध तालुक्यामंध्ये झालेल्या चांगल्या मार्गदर्शन शिबिरातुन नव्या पिढीला उत्तम मार्गदर्शन देखील लाभले, अशी संस्थेची ओळख ऍड सुबोध वाणी यांनी करुन दिली. नेहरु नगर येथील पत्रकार भवनात झालेल्या या परिषदेमध्ये २० जेष्ठ वकिलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अधिवक्ता परिषदेचे अध्यक्ष ऍड.सुबोध वाणी,
जिल्हा महामंत्री ऍड.भरत मराठे, परिषदेचे सदस्य ऍड.सचिन राणे, ऍड.अमोल गुलाले, ऍड.सरजू चव्हाण, ऍड.तुषार कापडीया, ऍड.केतकर, ऍड.रुतुल कुलकर्णी, ऍड.राजेश मराठी, ऍड इंदीस, ऍड.अनिल सराफ, ऍड.युवराज ईशी यांच्यासह अधिवक्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍड.स्वाती पाटील यांनी तर प्रस्तावना ऍड.भरत मराठे यांनी केली तर आभार ऍड.अमोल गुलाले यांनी मानले.








