नंदुरबार l प्रतिनिधी
ग्राहकतिर्थ स्व.बिंदूमाधव जोशी प्रणीत महाराष्ट्र प्रवासी महासंघाच्या नंदुरबार तालुकाध्यक्षपदी महादू हिरणवाळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. ग्राहक पंचायत महाराष्ट्राच्या राज्यस्तरीय बैठकीत प्रवासी महासंघाच्या राज्यातील जिल्हा व तालुकानिहाय कार्यकारीणीस मंजुरी देण्यात आली.
विमान प्रवासापासून एसटी आणि रेल्वे प्रवासा दरम्यान प्रवाशांना येणार्या विविध अडचणींसह प्रश्नांचे निरसन करण्यासाठी प्रवासी महासंघ कार्य करणार आहे.प्रवासी महासंघ नंदुरबार तालुकाध्यक्षपदी महादू हिरणवाळे, उपाध्यक्ष अॅड. निलेश देसाई, डॉ. गणेश ढोले, संघटक भरत माळी, सचिव अशोक यादबोले, सहसचिव गोपाल लगडे, सहसंघटक कमलाकर मोहिते, कोषाध्यक्ष योगेश्वर जळगांवकर, महिला सदस्य सौ. पुनम भावसार, प्रा. गिता संगपाळ – जाधव, प्रसिध्दी प्रमुख नितीन पाटील, सदस्य वैभव करवंदकर, रघुनाथ अहिरे, निमंत्रीत सदस्य, सुरेश जैन, दर्शन ठक्कर यांची निवड करण्यात आली आहे.