नंदुरबार l
येथील लायन्स क्लब व श्री दादा गणपती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानेश्री गणेश व गौरी आगमना निमित लायन्स परिवारातर्फे विद्यार्थी वर्गासाठी चित्रकला स्पर्धा इ. ५ ते ७ व इ ८ ते १० या दोन गटात आयोजित केली होती.चित्रकला स्पर्धेचे आयोजन डी. आर..हायस्कूल व श्रॉफ हायस्कूलमध्ये करण्यात आले होते.
इ ५ ते ७ च्या विद्यार्थ्यांना श्री. गणेशाचे चित्र तर इ ८ ते १० साठी गणपती विसर्जन मिरवणुकीचे चित्र असे विषय देण्यात आले होते.दोन्ही गट मिळून १५५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.यात इ ५ ते ७ या वयोगटात प्रथम पियुष निकवाडे,द्वितीय पुर्णा माहेश्वरी,तृतीय रितीका सोनार, उत्तेजनार्थ तन्मय कोकणी
तर ८ ते १० वयोगटात प्रथम जान्हवी भोई,द्वितीय हेमश्री पाटील,तृतीय राधिका सोनार, उत्तेजनार्थ वेदांत सोनार हे विजेते ठरले, तर गणपती सजावट स्पर्धेत प्रथम गुलाब पाटील,द्वितीय अनिल बरे,तृतीय शैलेश श्रॉफ उत्तेजनार्थ नरूभाई पाटील तर गौरी आरास स्पर्धेत प्रथम इशीका पाटील, द्वितीय राजू शुक्ल,तृतीय संजय फुलंब्रीकर आणि उत्तेजनार्थ अतुल कुलकर्णी हे विजेते ठरले.
या स्पर्धेचे परीक्षण चंद्रशेखर चौधरी व हेमंत पाटील यांनी केले.विजेत्या स्पर्धकांना दादा गणपती समोर मंडळ अध्यक्ष निलेश सोनार, उपाध्यक्ष वसंत सोनार, सचिव निखिल सोनार, कोषाध्यक्ष अमीत सोनार,यांचे सह लायन्स क्लब अध्यक्ष सतिश चौधरी, सचिव उध्दव तांबोळी, कोषाध्यक्ष शंकर रंगलानी, आनंद रघुवंशी,राहुल पाटील व चिंटू रंगलानी,श्रीराम दाऊतखाने,जिनेंद्र जैन यांच्या हस्ते दादा गणपतीची प्रतीमा व भेट वस्तू देऊन गौरवण्यात आले.वरील स्पर्धेसाठी प्रोजेक्ट चेअरमन म्हणून अश्वीन पाटील व दिनेश वाडेकर यांनी काम पाहिले.तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीराम दाऊतखाने यांनी केले.








