नंदुरबार l
जिल्हा किक बॉक्सिंग असोसिएशन व एस ए मिशन हायस्कूल नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमानाने एचपी डायमंड कप’ जिल्हास्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन एस.ए. मिशन हायस्कूलमध्ये करण्यात आले होते. सदर स्पर्धेत २०० अधिक खेळाडूंनी आपली उपस्थिती नोंदवली होती.
या स्पर्धेत श्रॉफ हायस्कूलच्या १४ वर्षातील मुलींच्या ३४ किलो वजन गटामध्ये स्नेहल पवार सुवर्णपदक, तर मुलांच्या ३८ किलो वजन गटात उदयराज सावंत सुवर्णपदक, ४० किलो वजन गटात भावेश सावंत सुवर्णपदक, ५२ किलो वजन गटात ओमकार वंगारी सुवर्णपदक, ३६ किलो वजन गटात साई सैंदाने रजत पदक, ४० किलो वजन गटात मोहित सोनवणे रजत पदक, ३२ किलो वजन गटात दिया पेंढारकर
रजत पदक, ३४ किलो वजन गटात नमन सोनार रजत पदक, ३६ किलो वजन गटात रिया पेंढारकर कांस्य पदक, ३० किलो वजन गटात आदित्य वंगारी कांस्यपदक, ३४ किलो वजन गटात ध्रुव सुरळकर कांस्यपदक मिळवले.
या सर्व विजयी खेळाडूंचे सार्वजनिक शिक्षण समितीचे चेअरमन ॲड.रमणलाल शाह, सचिव डॉ.योगेश देसाई, शाळेच्या मुख्याध्यापिका सुषमा शाह, उपमुख्याध्यापक राजेश शाह, पर्यवेक्षक जगदीश पाटील, पर्यवेक्षिका विद्या सिसोदिया, क्रीडा प्रमुख भिकू त्रिवेदी आदींनी अभिनंदन केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना क्रीडाशिक्षक सीमा पाटील, जगदीश वंजारी यांचे मार्गदर्शन लाभले.








