बोरद l वार्ताहर
सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या मोठा धनपूर येथे मीराबाई भाईदास धनका या 22 वर्षीय तरुणीवर वीज पडल्याने तिचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे
तिला पोलीस दुरक्षेत्राचे हवालदार गौतम बोराडे व पोलीस निलेश खोंडे तसेच छोटू कोळी हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले . त्या तरुणीला तळोदा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. संबंधित डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. दुपारी दोन वाजेच्या सुमारास विजेचा कडकडाट मोठ्या प्रमाणात होता आणि त्यामुळे ही मुलगी बाहेर उभी होती.तिच्यावरच वीज पडली आणि तिचा जागीच मृत्यू झाला.