Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्हाभरात आज २३७ गणेश मंडळातर्फे गणरायाला निरोप

team by team
September 9, 2022
in राज्य
0
जिल्ह्यातील ७३ मंडळांकडून गणरायाला निरोप, नंदुरबारात उशीरापर्यंत मिरवणुका होत्या सुरू

नंदुरबार | प्रतिनिधी

 

नंदुरबार जिल्ह्यात यंदा एकूण ८६० मंडळाकडून गणरायाची स्थापना करण्यात आली होती. उद्या अनंत चतुर्थीच्या शेवटच्या दिवशी जिल्ह्यातील २३७ गणेश मंडळातर्फे गणरायाला निरोप देण्यात येणार आहे. यात १२१ सार्वजनिक गणेश मंडळ ९८ खाजगी तर १८ एक गांव एक गणपती मंडळांचा समावेश आहे.

 

शासनाने यंदा गणेशोत्सवासाठी सर्व नियम शिथील करण्यात आल्याने कोरोना नंतर प्रथमच जिल्ह्यात गणेश उत्सव मोठया उत्साहात साजरा होत आहे. यावर्षी जिल्ह्यात ८६० मंडळाकडून गणरायाची स्थापना करण्यात आली होती. यात ४२३ सार्वजनिक, ३३८ खाजगी व ९९ एक गाव एक गणपतींचा समावेश होता. यामध्ये ८ टप्यांमध्ये गणरायाचे विसर्जन करण्याचे नियोजन करण्यात आले होते.

 

 

यात दिड दिवसाचा गणपतीमध्ये एका मंडळाकडून गणरायाचे विसर्जन करण्यात आले. तिसर्‍या दिवशी चार मंडळाकडून गणरायाला निरोप देण्यात आला तर दि.४ सप्टेंबर रोजी पाचव्या दिवशी २५८ मंडळाकडून गणरायाला निरोप देण्यात आला तर दि.५ सप्टेंबर रोजी जिल्हाभरात एकूण ७३ गणेश मंडळाकडून गणेश विसर्जन करण्यात आले तर दि.६ सप्टेंबर रोजी सातव्या दिवशी १९४ गणेश मंडळातर्फे गणरायाला निरोप देण्यात आला.

 

 

आठव्या दिवशी पाच व काल दि.८ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील ८९ गणेश मंडळांतर्फे गणेशाचे विसर्जन करण्यात आले. यात सार्वजनिक ४५, खाजगी ४२ तर दोन एक गांव गणपतीचा समावेश होता. अनंत चतुर्थीच्या दिवशी जिल्ह्याभरात २३७ गणेश मंडळातर्फे गणरायाला निरोप देण्यात येणार आहे. यामध्ये नंदुरबार शहर पोलीस ठाणे अंतर्गत ३० सार्वजनिक, ११ खाजगी, उपनगर पोलीस ठाणे अंतर्गत ५ सार्वजनिक, २ खाजगी,

 

 

तालुका पोलीस ठाणेतर्ंगत १४ सार्वजनिक, ५ एक गांव एक गणपती, नवापूर पोलीस ठाणेतर्ंगत २९ सार्वजनिक एक खाजगी, विसरवाडी पोलीस ठाणेतर्ंगत १ सार्वजनिक, एक एक गांव एक गणपती, शहादा पोलीस ठाणेतर्ंगत १८ सार्वजनिक, ७५ खाजगी तर ३ एक गांव एकगणपती, म्हसावद पोलीस ठाणेतर्ंगत २ सार्वजनिक, ३ खाजगी, ५ एक गांव एक गणपती, सारंगखेडा पोलीस ठाणेतर्ंगत  ४ सार्वजनिक, ४ खाजगी, २ एक गांव एक गणपती, धडगांव पोलीस ठाणेतर्ंगत ५ सार्वजनिक, १ खाजगी, २ एक गांव एक गणपती,

 

 

अक्कलकुवा तालुक्यातील ८ सार्वजनिक, एक खाजगी, तळोदा पोलीस ठाणेतर्ंगत २ सार्वजनिक, मोलगी पोलीस ठाणेतर्ंगत ३ सार्वजनिक असे १२१ सार्वजनिक, ९८ खाजगी, १८ एक गांव एक गणपती असे एकूण २३७  गणेश मंडळातर्फे गणरायांना निरोप देण्यात येणार आहे. दरम्यान गणेश विसर्जन मिरवणूकीदरम्यान कुठलीही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस दलातर्फे एक पोलीस अधिक्षक, एक अप्पर पोलीस अधिक्षक, ६ पोलीस उपअधिक्षक, १९ पोलीस उपनिरीक्षक, ६१ सहायक पोलीस निरीक्षक तथा उपनिरीक्षक, ७२९ पोलीस अंमलदार, १९४ महिला पोलीस अंमलदार , ५ स्ट्रायकिंग फोर्स, दोन आरसीटी, दोन क्यु.आर.टी., एक एसआरपीएफ कंपनी तर ६०० होमगार्ड असा तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात येणार आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

अभिनेता सोनू सुद बनणार चेतक फेस्टिव्हलचा ब्रॅड ॲम्बेसिडर

Next Post

सिमा तपासणी नाक्यावर होतेय कोटयावधींची लूट

Next Post
सिमा तपासणी नाक्यावर होतेय कोटयावधींची लूट

सिमा तपासणी नाक्यावर होतेय कोटयावधींची लूट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बेथेल कॉलनीमधील विकास कामांचे आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

बेथेल कॉलनीमधील विकास कामांचे आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

May 16, 2026
भालेर येथे भव्य रोजगार मेळाव्यांचे आयोजन

भालेर येथे भव्य रोजगार मेळाव्यांचे आयोजन

May 16, 2026
गांजासह पाच लाखाचा मुद्देमला जप्त; दोघांना घेतले ताब्यात

गांजासह पाच लाखाचा मुद्देमला जप्त; दोघांना घेतले ताब्यात

May 16, 2026
जिल्ह्यातील खासदार-आमदारांच्या बैठकीत आदिवासी भागांच्या रस्ते विकासावर भर

जिल्ह्यातील खासदार-आमदारांच्या बैठकीत आदिवासी भागांच्या रस्ते विकासावर भर

May 16, 2026
नंदुरबार तालुक्यातील गावांना  माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्या हस्ते पाणी टँकरचे वितरण

नंदुरबार तालुक्यातील गावांना माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्या हस्ते पाणी टँकरचे वितरण

May 16, 2026
भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

May 9, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add