नंदुरबार l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील रायंगण गावाजवळ वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने एक जण जखमी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नवापूर तालुक्यातील पाटीबेडकी येथील सुनिल गावित हे दुचाकीने (क्र.जी.जे.१९ के १८४७) धुळे-सुरत महामार्गाने जात होते. यावेळी हितेश रघुनाथ पगारे (रा.खंडलाय खुर्दे ता.धुळे) याने त्याच्या ताब्यातील वाहन (क्र.एम.एच.१२ ४८४७) रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात वाहन चालवून रायंगण गावाजवळ दुचाकीला धडक दिल्याने अपघात घडला.
घडलेल्या अपघातात सुनिल गावित यांना गंभीर दुखापत झाली. याबाबत आकाशा सुनिल गावित यांच्या फिर्यादीवरुन नवापूर पोलिस ठाण्यात हितेश पगारे याच्याविरोधात भादंवि कलम २७९, ३३८, ३३८, मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.नरेंद्र नाईक करीत आहेत.