नंदुरबार l प्रतिनिधी
नवापूर शहरातील पोलिस ठाण्याच्या गेटसमोरील आवारात आपसात मारामारी करणाऱ्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नवापूर पोलिस ठाण्याच्या गेटसमोरील आवारात निर्मला वाड्या गावित, शिला दिलीप गावित, कांता सिंधा गावित, अजय वाड्या गावित व दिलीप युसूफ गावित हे आपसात मारामारी करीत शिवीगाळ व आरडाओरड करीत शांततेचा भंग करतांना आढळून आले.
याबाबत पोशि.पवन काकरवाल यांच्या फिर्यादीवरुन नवापूर पोलिस ठाण्यात पाच जणांविरोधात भादंवि कलम १६० सह महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ११२/११७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास पाटील करीत आहेत.