Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

दोन गटात तुंबळ हाणामारी सात जण जखमी ; परस्पर फिर्यादीतून २१ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

team by team
September 8, 2022
in क्राईम
0
शहाद्यात एकास लोखंडी सळईने मारहाण, दोघांविरूध्द गन्हा दाखल
नंदुरबार  l प्रतिनिधी
 नवापूर तालुक्यातील शेही येथे पोलिस ठाण्यात दाखल गुन्हा मागे घेण्याच्या कारणावरुन दोन गटात हाणामारी झाली. यात दोन्ही सात जण जखमी झाले असून परस्पर फिर्यादीतून २१ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नवापूर तालुक्यातील शेही येथील ज्योती रितेश वळवी यांनी विवेक रमेश वळवी याच्याविरोधात केलेला गुन्हा मागे घेण्याच्या कारणावरुन विवेक रमेश वळवी याने ज्योती वळवी यांना काठीने डोक्यावर मारुन दुखापत केली. तसेच पियुष विवेक वळवी, मनोज विवेक वळवी, जिवन रमेश वळवी, सुनिताबाई विवेक वळवी, सुरेखाबाई दिनेश वळवी,
लिलाबाई कोट्या पाडवी, निखील रमेश वळवी व दिनेश प्रल्हाद वळवी यांनी ज्योती वळवी यांचे सासरे बापु वळवी, सासू रशिलाबाई वळवी, जेठाणी लक्ष्मीबाई यांनाही हाताबुक्यांनी मारहाण केली. तसेच शिवीगाळ करीत जिवेठार मारण्याची धमकी दिली.
याबाबत ज्योती वळवी यांच्या फिर्यादीवरुन विसरवाडी पोलिस ठाण्यात ९ जणांविरोधात भादंवि कलम १४३, १४७, १४९, ३२४, ३२३, ५०४, ५०६ सह महाराष्ट्र पोलिस अधिनियम कायदा कलम ३७ (१) (३) चे उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक नरेंद्र वळवी करीत आहेत.
तर पियुष विवेक वसावे यांनी दिलेल्या परस्पर फिर्यादीत म्हटले आहे की, ज्योती रितेश वळवी यांनी पियुष वळवी यांचे वडील विवेक वळवी यांच्याविरोधात दाखल गुन्ह्यात जामीन झाला. या कारणावरुन नटवर उर्फ विश्वनाथ सुदाम वळवी, रितेश बापू वळवी, प्रमोद बापू वळवी, महेंद्र बापू वळवी, विष्णू जोलू वळवी, संजय विष्णू वसावे, बापू फूलजी वळवी, संदिप कांतीलाल वळवी, अविनाश जिवल्या मावची, रशिलाबाई बापू वणी, ज्योती रितेश वळवी, ममताबाई नटवर वळवी यांनी पियुष वळवी यांची आई व काकू यांना हाताबुक्यांनी मारहाण केली.
तसेच पियुष वळवी व त्यांचे वडील विवेक वळवी, आजोबा रमेश वळवी व काका जिवन रमेश यांनाही हाताबुक्यांनी मारहाण केली. तसेच शिवीगाळ करीत जिवेठार मारण्याची धमकी दिली. याबाबत पियुष वळवी यांचय फिर्यादीवरुन विसरवाडी पोलिस ठाण्यात १२ जणांविरोधात भादंवि कलम १४३, १४७, १४९, ३२४, ३२३, ५०४, ५०६ सह महाराष्ट्र पोलिस अधिनियम कायदा कलम ३७ (१) (३) चे उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.हिन्दुस्थान नाईक करीत आहेत.
बातमी शेअर करा
Previous Post

शेतीच्या वादातून पती-पत्नीस मारहाण, पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

वाहनातून सव्वा लाखाचे किटकनाशक लंपास

Next Post
वाहनातून सव्वा लाखाचे किटकनाशक लंपास

वाहनातून सव्वा लाखाचे किटकनाशक लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

September 17, 2026
नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add