नंदुरबार l प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील भाबलपूर येथे शेतीच्या वादातून पती-पत्नीस मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, अक्कलकुवा तालुक्यातील भाबलपूर येथील सुभाष भरतसिंग वसावे व विरेंद्र गोबजी वसावे यांच्यात शेतीवरुन वाद झाला. या वादातून सुभाष वसावे यांच्या घरासमोर येवून विरेंद्र गोबजी वसावे, हरीचंद्र गोरजी वसावे, मेवालाल यशवंत वसावे, अविनाश विरेंद्र वसावे व नारायण विरेंद्र वसावे हे शिवीगाळ करीत होते. यावेळी सुभाष वसावे यांची पत्नी गायत्री वसावे यांनी शिवीगाळ का करतात, असे विचारले.
याचा राग आल्याने सुभाष वसावे यांना काठीने मारहाण करुन दुखापत केली. तसेच त्यांची पत्नी गायत्री वसावे यांनाही मारहाण करण्यात आली. याबाबत सुभाष वसावे यांच्या फिर्यादीवरुन तळोदा पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध भादंवि कलम १४३, १४७, १४९, ३२४, ५०४, ५०६ सह महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ३७ (१) (३) चे उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.गोवर्धन वसावे करीत आहेत.









