नंदुरबार | प्रतिनिधी

येथील लायन्स क्लब व गार्गी गृपतर्फे दि.११ सप्टेंबर रोजी मिस व मिसेस या भव्य सौंदर्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी सैराट चित्रपटातील आर्ची अर्थात अभिनेत्री रिंकु राजगुरू प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे, अशी माहिती स्पर्धेच्या आयोजक सौ.शितल चौधरी व डॉ.तेजल चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
याबाबत लायनेस क्लबच्या अध्यक्षा तथा गार्गी गृपच्या संचालिका सौ.शितल चौधरी यांनी सांगितले, दि.११ सप्टेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज नाटयमंदिरात मिस व मिसेस या सौंदर्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. अशा प्रकारची सौंदर्य स्पर्धा ही शहरात किंबहूना जिल्हयात प्रथमच होत आहे.
स्पर्धेचे प्रमुख आकर्षण म्हणजे यावेळी सैराट फेक आर्ची अर्थात मराठी सिने अभिनेत्री रिंकू राजगुरू यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. त् याचबारोबर प्रसिध्द मॉडेल अभिजीत म्हात्रे आणि उद्योजक विशाल कपूर हेदेखील उपस्थित राहणार आहेत.
जिल्हयातील तरूणी व महिलांना चांगले व्यासपीठ मिळावे, त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठीच या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी जास्तीत जास्त महिला व तरुणींनी स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन सौ.चौधरी, लायन्सच्या विभागीय अध्यक्षा डॉ.सौ.तेजल चौधरी यांनी केले आहे.









