Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

विविध उपक्रम राबवून पोषण माह यशस्वी करण्याचे :जिल्हाधिकारी मनीषा खत्री

team by team
September 6, 2022
in राज्य
0
विविध उपक्रम राबवून पोषण माह यशस्वी करण्याचे :जिल्हाधिकारी मनीषा खत्री
नंदुरबार  l
 महिला व बालकांच्या आरोग्य व पोषण विषयक स्थितीमध्ये सुधारणा घडवून आणण्याकरिता जनजागृती हा घटक महत्वपूर्ण आहे. समाजामध्ये जनजागृती घडवून आणण्याकरिता दरवर्षी सप्टेंबर हा महिना राष्ट्रीय पोषण महिना म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने विविध उपक्रम राबवून तो यशस्वी करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बिरसा मुंडा सभागृहात राष्ट्रीय पोषण महिन्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या हस्ते झाले. यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी (मबावि) कृष्णा राठोड, उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गोविंद चौधरी आदी उपस्थित होते.
श्रीमती खत्री म्हणाल्या की, आरोग्य, शिक्षण व महिला व बालविकास विभाग यांनी योग्य समन्वय साधून हा यंदाचा पोषण महिना यशस्वी करावा. पोषण महिना कार्यक्रमाला केवळ जनआंदोलनाचे स्वरुप न ठेवता लोकांचा सक्रिय सहभाग असण्याकरीता विविध उपक्रमांचे नियोजन करण्याचे केंद्र शासनाने सूचित केलेले आहे. यासाठी महिला व बाल विकास विभागाच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे पोषण अभियानामध्ये विविध उपक्रमाचे आयोजन करावे.
पोषण माह साजरा करण्यासाठी संपूर्ण देशपातळीवर केंद्र शासनाने 4 प्रमुख संकल्पनेद्वारे राष्ट्रीय पोषण महिना साजरा करावयाचा आहे. यात महिला आणि स्वास्थ्य, बालक आणि शिक्षण -पोषणाबरोबर शिक्षण देखील, लिंग संवेदनशीलता, जलसंधारण आणि व्यवस्थापन, आदिवासी भागातील महिला आणि मुलांसाठी पारंपारिक खाद्यपदार्थ  या संकल्पनेवर हा पोषण महिना साजरा करावा.
पोषण महिना राबविण्याकरीता उपक्रमाची तपशीलवार दिनदर्शिकानुसार गणेशोत्सव पोषण आरास व पोषण विषयक देखावे लावावेत. तरंग सुपोषित महाराष्ट्र कार्यक्रम संदर्भात माहिती द्यावी. पोषण रॅलीचे आयोजन करावे. शाळा, महाविद्यालयात रांगोळी स्पर्धा, चित्रकला, निबंध स्पर्धांचे आयेाजन करावे. सॅम असलेल्या अंगणवाडी केद्रांची तपासणी करावी. बालकांची आरोग्य तपासणी करावी. बालविवाह विरोधी शपथ द्यावी. स्थानिक भाजीपाला व फळे व रानभाज्याचे प्रदर्शने आयोजित करुन त्यांचे महत्व सांगावेत. गरोदर मातांसाठी योगाचे आयोजन करावे. मातांच्या बैठका घ्याव्यात.
सॅम, मॅम बालके, गर्भवती, स्तनदा मातांची तपासणी करावी. पाककृती स्पर्धांचे आयेाजन करावे. वैविध्यपूर्ण पोषण थाळी तयार करुन त्यांच्या स्पर्धा आयेाजित कराव्यात. गरोदर मातांची नोंदणी करावी. स्तनपानाविषयी माहिती द्यावी. महिला मेळाव्यांचे आयोजन करावे, असे विविध कार्यक्रम घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्यात.
यावेळी जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या हस्ते राष्ट्रीय पोषण माहचे उद्घाटन करण्यात येवून पोषण प्रतिज्ञाचे वाचन करण्यात आले. या कार्यक्रमाला तालुका वैद्यकीय अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका व अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.
बातमी शेअर करा
Previous Post

खामगाव येथे लोकसेवकास खोटी माहिती दिल्याने एकाविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

10 हजाराच्या लाचेची मागणी भोवली, प्रभाग समन्यवक याच्याविरुद्ध लाच लुचपत विभागाने केला गुन्हा दाखल

Next Post
10 हजाराच्या लाचेची मागणी भोवली, प्रभाग समन्यवक याच्याविरुद्ध लाच लुचपत विभागाने केला गुन्हा दाखल

10 हजाराच्या लाचेची मागणी भोवली, प्रभाग समन्यवक याच्याविरुद्ध लाच लुचपत विभागाने केला गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ.विजयकुमार गावितांच्या प्रकृतीत सुधारणा; नवसपूर्तीसाठी २२ किलोमीटरची पदयात्रा

डॉ.विजयकुमार गावितांच्या प्रकृतीत सुधारणा; नवसपूर्तीसाठी २२ किलोमीटरची पदयात्रा

November 4, 2026
दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

November 1, 2026
खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

November 1, 2026
सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

November 1, 2026
भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

November 1, 2026
सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

October 31, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add