नंदुरबार | प्रतिनिधी
जिल्हा आरोग्य विभागात पेसांतर्गत कर्मचार्यांची भरती करण्यात यावी अशी मागणी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांच्याकडे भारतीय ट्रायबल पार्टीने निवेदनाद्वारे केली आहे. जिल्हाध्यक्ष के.टी.गावीत यांनी हे निवेदन दिले.
निवेदनात, आरोग्य विभागाकडून सेवा दिली जात आहे. परंतु सर्वच ठिकाणी अपूर्ण कर्मचारी व सुविधांचा अभाव असल्यामुळे गुणात्मक दर्जाची आरोग्यसेवा जनतेला मिळत नाही. आरोग्य विभागात अनुसूचित जमाती प्रर्वातील विविध पदे रिक्त आहेत. जिल्ह्यातील आरोगय सेवा संस्थांचे इंडीयन पब्लिक हेल्थ स्टँडर्डच्या गाईडलाईनच्या अनुषंगाने सर्वेक्षण करावे व सर्व शाळांचा अहवाल जनतेच्या माहितीकरीता प्रसारीत करावा तसेच त्यातील त्रुटी कर्मचारी व सुविधांचा अभाव तात्काळ दूर करून भारत सरकारच्या इंडीयन पब्लिक हेल्थ स्टँडमध्ये नमूद केलेल्या गाईडलाईन नुसान जनतेला आरोग्यसेवा पुरविण्यात यावी अशी मागणी के.टी.गावीत यांनी निवेदनाद्वारे केली आहे.