नंदुरबार | प्रतिनिधी
जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापकांनी सन २०२१-२०२२ या शैक्षणिक वर्षात विविध शिष्यवृत्तीबाबतचे प्रस्ताव १५ ऑक्टोंबर २०२१ पर्यंत सादर करावयाचे आहेत.
जिल्हा समाज कल्याण, जिल्हा परिषद कार्यालयामार्फत माध्यमिक शाळेत शिकणार्या अनुसूचित जमाती, विजाभज, गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना शिक्षण फी, परीक्षा फी, शिष्यवृत्ती योजना, अनुसूचित जाती, जमाती, विजाभज या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना गुणवंत्ताधारक शिष्यवृत्ती, अस्वच्छ व्यवसायात कामकरणार्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती, नववी ते दहावी मध्ये शिकणार्या अनुसूचित जातीचे मुले व मुलींची शिष्यवृत्ती, अनुसूचित जातीच्या मुलींसाठी सावित्रीबाई शिष्यवृत्ती, विजाभज, विमाप्र मुलींसाठी सावित्रीबाई शिष्यवृत्ती, इमाव मुलींसाठी सावित्रीबाई शिष्यवृत्ती योजना, इयत्ता पहिली ते दहावी मध्ये शिकत असणार्या इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती (एन.टी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ) तसेच इतर शिष्यवृत्ती योजना विद्यार्थ्यांना मंजूर केली जाते.
मुख्याध्यापकांनी यासंबंधित शिष्यवृत्तीचे प्रस्ताव जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, नंदुरबार यांच्याकडे सादर करावे, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी डी.जी.नांदगावकर यांनी केले आहे.