नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील रनाळे येथील बबलु कदमबाड़े यांच्या घरि गौरी ( महालक्ष्मी ) ची स्थापना करण्यात आली असून
उद्या दि.5 सप्टेंबर रोजी .गौरीचे विसर्जन होणार आहे. गौरी गणपती स्थापनामुळे नागरिकांमध्ये उत्साह संचारला आहे.
शनिवारी गौराईंची प्रतिष्ठापना झाल्यानंतर दि. 4 रोजी विधीवत महापूजा झाली. महाभिषेकासह गौराईला महानैवेद्यही दाखवण्यात आला. दरम्यान सायंकाळी सुवासिनींना दर्शन आणि हळदीकुंकुसाठी निमंत्रण दिले जाते. उद्याच्या महापूजेनंतर उद्या दि. 5 रोजी गौराईंना दहीभाताचा नैवेद्य दाखवून निरोप दिला जाणार आहे. गौराईंचा हा सण मोठ्या भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात साजरा केला जात आहे.
गौराईंच्या सणासाठी बाहेरगावी असलेले कुटूंबातील सदस्यदेखील या दिवशी एकत्र येवून जमतात. तीन दिवस माहेराला येणार्या या गौराईंसाठी कुटूंबातील सर्वच सदस्यांची लगबग बघायला मिळते.
गणेशोत्सव काळात भाद्रपद महिन्याच्या सप्तमी तिथीला श्री महालक्ष्मीचे आगमन होते. खान्देशात बहुतांश ठिकाणी गौराईंचा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. तीन दिवस माहेराला येणार्या गौराईंना दुसर्या दिवशी पुरणपोळी, सोळा भाज्यांचा नैवेद्य दाखविला जातो. शनिवारी सुवासिनींनी ‘आल्या आल्या गौरी, सोन्याच्या पावली म्हणून मंगलमय वातावरणात गौराईंचे थाटात स्वागत केले. गौराईंच्या सणासाठी आकर्षक अशी सजावटही केली जाते.








