शहादा l
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नंदुरबार व पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय शहादा यांच्या संयुक्त विद्यमाने आझादी का अमृतमहोत्सव व राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्ताने ‘क्रीडा मंडळाचे उद्घाटन’ व ‘खेळाडू विद्यार्थ्याना स्पर्धा परीक्षेतून संधी’ याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
मंडळाच्या महात्मा गांधी सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एस. पाटील होते. प्रमुख अतिथी क्रीडा उपसंचालक नाशिक विभाग नाशिक तथा नंदुरबार जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती सुनंदा पाटील, भामरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक केंद्रांचे संचालक युवराज भामरे, प्रा. मयुर ठाकरे(अध्यक्ष युवा क्रीडा शिक्षक व शारीरिक शिक्षण प्रमुख महाराष्ट्र राज्य), कनिष्ठ महाविद्यालयाचा उपप्राचार्या प्रा.श्रीमती कल्पना पटेल, पर्यवेक्षक प्रा. के. एच नागेश, जेष्ठ क्रीडा मार्गदर्शक प्रा. मनिलाल चौधरी, क्रीडा विभागाचे प्रमुख प्रा.डॉ. अरविंद कांबळे, प्रा. ए. एम. पाटील, प्रा. ए.पी. पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलमाने करण्यात आली.यावेळी बोलतांना श्रीमती पाटील म्हणाल्या, शारिरीक व मानसिक दृष्ट्या व्यक्ति फिट असल्यावर कुठल्याही क्षेत्रात प्रगती करु शकतो. त्यासाठी नियमित व्यायाम, योगा व प्राणायम करणे महत्वाचे आहे. विद्यार्थ्याना सर्व प्रकारच्या इव्हेंटसाठी तयारी करता येईल असे सोयी, भौतिक सुविधा असलेले हे मद्याविद्यालय आहे. याचा फायदा आपण घेतला पाहिजे. युवराज भामरे यांनी, आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करित असतांना त्याचे नियोजन व स्पर्धा परीक्षा अंतर्गत खेळाडूंना मिळणारे आरक्षण याबाबत मार्गदर्शन केले. अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ.पाटील यांनी सांगितले, विद्यार्थी हा महाविद्यालयाचा केंद्रबिंदु आहे. महाविद्यालयातून शिक्षण घेऊन यशस्वी नागरिक घडला पाहिजे.
यासाठी महाविद्यालयातील सर्व अध्यापक तळमळीने ज्ञानदानाचे कार्य करतात. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ.कांबळे यांनी केले.सुत्रसंचालन प्रा. एम. एस.चौधरी यांनी केले. आभार प्रा.जितेंद्र माळी यांनी मानले. कार्यक्रमासाठी मंडळाचे अध्यक्ष दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, सचिव श्रीमती कमलताई पाटील, समन्वयक प्रा. मकरंद पाटील यांनी मार्गदर्शन केले. यशस्वीतेसाठी महाविद्यालयाच्या सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.








