नंदुरबार l
संत निरंकारी चँरीटेबल फाऊंडेशन दिल्ली शाखा भादवड यांच्या वतीने युगप्रवर्तक बाबा गुरबचनसिंहजी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मानव एकता दिवसाच्या निमित्ताने रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात 99 निरंकारी बांधवांनी रक्तदान करुन आदर्श निर्माण केला आहे.
नंदुरबार तालुक्यातील भादवड येथील पाचकंदिल चौकात मानव एकता दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन संत निरंकारी मंडळ धुळे झोन 36-बी चे झोनल ईंचार्ज हिरालाल पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले.
याप्रसंगी भादवडचे सरपंच सविता पाटील, उपसरपंच योगेश पाटील, भटु पाटील, रमेश पाटील, संतोष पाटील, चिंधा मिस्त्री आदी उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांनी उपस्थित मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मिशनच्या कार्याची प्रसंशा करुन मिशन आध्यात्मिक कार्यासोबत सामाजिक उपक्रम कार्यातून योगदान देत आहे.
या शिबिरामध्ये 99 निरंकारी बांधवांसह नागरीकांनी रक्तदान करुन शिबिरास प्रतिसाद दिला. रक्त संकलनासाठी जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीच्या कर्मचार्यांचे सहकार्य लाभले. रक्तदान शिबीरचा समारोप विशाल सत्संग कार्यक्रमाने झाला.
आतापर्यंत संपूर्ण भारतात 265 ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन केले असून सुमारे 40 हजार ते 50 हजार युनिट रक्त संकलित होईल, अशी अपेक्षा आहे. रक्तदात्यांना प्रशस्तीपत्र देवुन सन्मानित करण्यात आले. शिबिर यशस्वीतेसाठी संत निरंकारी मंडळ शाखा भादवड व नंदुरबार शाखेचे मुखी पुंडलिक निकुंभे यांच्यासह सदस्य व सेवादल अधिकारी, सेवादल सदस्यांनी परिश्रम घेतले.








