Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार शहरातील १३ डीजे व डॉल्बी सिस्टीम स्वेच्छेने पोलीसांकडे सुपूर्द

team by team
September 2, 2022
in क्राईम
0
नंदुरबार शहरातील १३ डीजे व डॉल्बी सिस्टीम स्वेच्छेने पोलीसांकडे सुपूर्द

नंदुरबार । प्रतिनिधी-

गणेशोत्सव काळात डी.जे. व डॉल्बी साऊंड सिस्टीम न वाजविता पारंपारिक वाद्य वाजवावे असे आवाहन नंदुरबार जिल्हा पोलीस दलामार्फत करण्यात आले होते. त्यानुसार डी.जे. व डॉल्बी असोसिएशनच्या पुढाकाराने नंदुरबार शहरातील 13 डी.जे. व डॉल्बी सिस्टिम स्वेच्छेने नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडे जमा केले आहेत.

 


नंदुरबार जिल्ह्यात यावर्षी डी.जे. व डॉल्बी सिस्टिमचा वापरावर बंदी घालण्यात आलेली आहे. गणेशोत्सव काळात डी.जे. व डॉल्बी साऊंड सिस्टीम न वाजविता पारंपारिक वाद्य वाजवावे. डी.जे. व डॉल्बीचा वापर केल्यास संबंधीतांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी दिला होता.

 

या आवाहनाला नंदुरबार शहरातील डी.जे. व डॉल्बी असोसिएशने सकारात्मक प्रतिसाद दिला. तसेच नंदुरबार शहरातील 13 डी.जे. व डॉल्बी सिस्टिम वाहनासह नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे स्वेच्छेने जमा केले. तसेच वाहनांच्या चाव्या नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांचेकडे डी.जे. व डॉल्बी असोसिएशनचे अध्यक्ष पंडीत माळी यांनी सुपुर्त केलेल्या आहेत.

 

यावेळी पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, उपअधीक्षक सचिन हिरे, पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, तालुका पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार, डी.जे. व डॉल्बी असोसिएशनचे अध्यक्ष पंडित माळी, उपाध्यक्ष किरण बडगुजर, सचिव राकेश कापडे, मातोश्री साऊंडचे मालक योगेश बारी, राजज्योती साऊंडचे मालक धिरज कुंवर,

 

शिव मल्हार साऊंडचे मालक गणेश सुळ, एनडी साऊंडचे मालक भुषण कोळी, समर्थ साऊंडचे मालक वरुण चव्हाण, पवन साऊंडचे मालक पवन कोकणी, माऊली साऊंडचे मालक नितीन कुंभार, मारुती राया साऊंडचे मालक घारु कोळी, वैष्णवी साऊंडचे मालक संकेत भोईटे, साई समर्थ साऊंडचे मालक निलेश मराठे, साई सरकार साऊंडचे मालक शैलेश मराठे, रिद्दी सिध्दी साऊंडचे मालक खंडु माळी, विघ्नहर्ता साऊंडचे मालक बंटी जगताप, मंगलमुर्ती साऊंडचे मालक राहुल चौधरी इत्यादी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार तालुका विज्ञान प्रदर्शनात एकूण १०२ उपकरणे

Next Post

तोरणमाळ आंतरराष्ट्रीय शाळेतील रिक्त पदे भरुन समस्या सोडवा : सिताराम पावरा

Next Post
तोरणमाळ आंतरराष्ट्रीय शाळेतील रिक्त पदे भरुन समस्या सोडवा : सिताराम पावरा

तोरणमाळ आंतरराष्ट्रीय शाळेतील रिक्त पदे भरुन समस्या सोडवा : सिताराम पावरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

कोपर्ली इंदाणी विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

July 31, 2026
सैनिकी विद्यालयात गुरु पूजन उत्सव उत्साहात साजरा

सैनिकी विद्यालयात गुरु पूजन उत्सव उत्साहात साजरा

July 31, 2026
खादी मंडळाच्या वरिष्ठ पर्यवेक्षकाला ५ हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले

एक लाख आठ हजार महिना पगार तरीही अडीच हजाराची लाच घेताना मुख्याध्यापक एसीबीच्या जाळ्यात

July 31, 2026
भाजपाचे माजी महामंत्री विजय चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल

भाजपाचे माजी महामंत्री विजय चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल

July 31, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत गैरसमज दूर करा: अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत गैरसमज दूर करा: अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे

July 31, 2026
नांदरखे येथे प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत आषाढी एकादशी उत्साहात

नांदरखे येथे प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत आषाढी एकादशी उत्साहात

July 27, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add