नंदुरबार l
येथील हि.गो.श्राॅफ हायस्कूलमध्ये पंचायत समिती शिक्षण विभाग व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांचेतर्फे आयोजित ४२ वे. तालुका विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन रिमोटद्वारे दीपप्रज्वलन करून जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी तहसीलदार भाऊसाहेब थोरात, प्राथमिक उपशिक्षणाधिकारी भानुदास रोकडे, माध्यमिकचे उपशिक्षणाधिकारी आर.बी.पाटील, गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील, सहाय्यक प्रकल्प अधिकारी शैलेष पटेल, शिक्षण विस्तार अधिकारी एस.एफ.ठाकरे, तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष कपूरचंद मराठे, मुख्याध्यापिका सुषमा शाह, मनीष शाह,उपमुख्याध्यापक राजेश शाह,फयाझखान,मनोहर साळुंखे,केंद्रप्रमुख,अदी उपस्थित होते.
उद्घाटनानंतर मान्यवरांनी विज्ञान प्रदर्शनातील उपकरणांची पाहणी करून माहिती जाणून घेतली. प्रदर्शनात एकूण १०२ उपकरणे मांडण्यात आली आहे.यात पहिली ते पाचवीच्या प्राथमिक गटात एक, सहावी ते आठवीच्या उच्च प्राथमिक गटात ३८, नववी ते बारावीच्या माध्यमिक उच्च माध्यमिक गटात ५३ व शैक्षणिक साधन निर्मिती, लोकसंख्या शिक्षण,प्रयोगशाळा परिचर,सहाय्यक या गटात १० उपकरणे मांडण्यात आली आहे. कार्यक्रमात आर.बी.पाटील, शैलेष पटेल, व भानुदास रोकडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक मुख्याध्यापिका सुषमा शाह यांनी केले.तर सूत्रसंचालन चेतना पाटील व आभार वसंत पाटील यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्रॉफ हायस्कूलच्या शिक्षक व कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.








