Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

प्राथमिक शिक्षण स्थानिक भाषेतून देण्यासाठीचा उपक्रम राबवणार – शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर

team by team
August 31, 2022
in शैक्षणिक
0
प्राथमिक शिक्षण स्थानिक भाषेतून देण्यासाठीचा उपक्रम राबवणार – शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर

सिंधुदुर्गनगरी

 राज्यातील प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी बोली भाषा आहे. या बोली भाषेतून प्राथमिक शिक्षण मुलांना दिले तर ते जास्त चांगले होणार आहे. या बोली भाषेच्या माध्यमातूनच मग त्यांना हळूहळू प्रमाण भाषेकडे नेल्यास त्यांचा शिक्षणाचा पाया भक्कम होईल. त्यामुळे अशा प्रकारे स्थानिक भाषेतून प्राथमिक शिक्षण देण्यासाठी पुस्तकांची निर्मिती डाएटमार्फत करण्यात यावी अशा सूचना शालेय शिक्षण व मराठी भाषामंत्री दीपक केसरकर यांनी  दिल्या. सावंतवाडी येथे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या.

यावेळी कोल्हापूर विभागाचे उपसंचालक महेश चोथे, प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, रत्नागिरी डाएटचे प्राचार्य गजानन पाटील, सिंधुदुर्गचे प्राथमिक शिक्षणाधिकारी महेश धोत्रे, माध्यमिक शिक्षणाधिकारी मुश्ताक शेख, सिंधुदुर्ग डाएटच्या प्राचार्य अनुपमा तावशीकर, रत्नागिरीचे माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, प्राथमिक शिक्षणाधिकारी वामन जगदाळे आदी उपस्थित होते.

मुलांचा कल ८ वी पासूनच ठरवण्यात यावा अशा सूचना करुन शालेय शिक्षण मंत्री श्री. केसरकर म्हणाले, मुलांना प्राथमिक शिक्षणाच्या अवस्थेमध्येच व्यावसायिक शिक्षणाविषयी गोडी निर्माण करता आली पाहिजे. त्यांना स्थानिक भाषेतून शिक्षण दिले पाहिजे. मुलांमधील सुप्त गुणांना वाव देणे ही काळाची गरज आहे. असे सुप्त गुण हेरून त्यावर शिक्षकांनी काम केले पाहिजे. त्यासाठी एक प्रकल्प तयार करण्यात यावा. हा प्रकल्प राज्यभर राबवण्यासाठी कशा प्रकारे नियोजन करता येईल याचा अभ्यासही करावा, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

सुरुवातीस कोल्हापूर उपसंचालक श्री. चोथे यांनी कोल्हापूर विभागाचा आढावा सादर केला. त्यामध्ये विभागातील अधिकारी, कर्मचारी व शिक्षक यांची पदे, रिक्त पदे, राबवण्यात येणारे विविध उपक्रम, शाळांची स्थिती यांचा समावेश होता. तर शालेय शिक्षण मंत्री श्री. केसरकर यांनी डाएट आणि सिंधुदुर्ग व रत्नागिरी विभागांचा स्वतंत्र आढावा घेतला. त्यामध्ये रिक्त पदांसोबतच कोकणी भाषेतून इयत्ता 1 ली व 2 रीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण, शाळांमधील मुलभूत सोयी, पुस्तकांसोबत मुलांना शाळेमध्ये वह्यांचे वाटप कसे करता येईल या गोष्टींचा समावेश होता.

बातमी शेअर करा
Previous Post

शहादा येथील पोलीस वाहनाला सीसीटीव्ही कॅमेरे, जिल्ह्यातील पहिलेच ठरले पोलीस वाहन

Next Post

तापी नदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेलेले चार जण बुडाली, तिघांना वाचवण्यात यश, एक जण मात्र अद्याप बेपत्ता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add