नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथील पोलीस वाहनाला सीसीटीव्ही कॅमेरे, जिल्ह्यातील पहिलेच पोलीस वाहन ठरले असून जनसामान्यांचे त्याचे आकर्षन वाटत आहे.
शहादा येथील पोलीस ठाण्यातील वाहनाला सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे. यामुळे शहादा शहरात कायदा सुव्यवस्था राखण्यात मदत होणार आहे. शहादा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांच्या संकल्पनेतून पोलीस मोबाईल वाहन (क्र. एम. एच. 39, ए.0242) या वाहनांवर चार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत,
जेणेकरून गणेशोत्सव काळात शहरात गस्त घालत असतांना अनुचित प्रकार घडला तर त्याचे फुटेज सहज मिळेल, व गुन्हेगारी प्रवृतीला आळा बसेल, गणेश उत्सव शांततेत पार पडावा यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे हे यातून स्पष्ट होत आहे.









