नंदूरबार l प्रतिनिधी

धडगाव येथील दुर्गम भागातील एकमेव अश्या ग्रामीण रुग्णालयाला नवजात शिशुसाठी देण्यात आलेली नवीन सरकारी रूग्णवाहिका चक्क पर्यटणासाठी तोरणमाळ येथे नेवून दिवसभर पर्यटन केल्याचा प्रकार येथील काही कर्मचाऱ्यांनी केल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे या नवीन रुग्णवाहिकेचा लाभ अद्याप एकाही रुग्णालय मिळालेला नाही. त्यातच वेळीच उपचारासाठी दोन बालकांनारुग्णावाहिकेची आवश्यकता असतांना ती मिळू न शकल्याने एकाला दुसऱ्या 108 रुग्णावाहिकेतुन नंदुरबार येथे हळविण्यात आले, तर एकाला आपल्या प्राणास मुकावे लागले असल्याचे समजते.
धडगाव हा अतिदुर्गम भागातील तालुका आहे. येथे आरोग्य सुविधानाची वानवा असल्याने ग्रामीण रुग्णालयात सुविधा व स्पेशालिस्ट डॉक्टरांच्या अभावी रुग्णांना नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात हलवावे लागते. यासाठी वेळोवेळी रुग्णावाहिकेची गरज भासते.
येथील सर्वच रुग्णवाहीकांची अवस्था आधीच दयनीय झाली आहे. शासनाने नुकतीच नवजात शिशुच्या सोयीसाठी अद्ययावत अशी रुग्णवाहीका येथील ग्रामीण रुग्णालयाला दिली आहे. तिचा वापर अद्याप पर्यंत कोणत्याही रुग्णासाठी करण्यात आलेला नसतांना धडगांव सरकारी रुग्णालयातील कर्मचाऱी चालक दिगंबर चटपले,क्लार्क किशोर भदाणे, औषध निर्माता सुनील भिवगडे सह मित्रांनी थंड हवेचे ठिकाण तोरणमाळ येथे रविवारच्या सुट्टीची संधी साधून नेली.
एरव्ही रुग्णांना जुन्या ॲम्बुलन्सने उपचारासाठी धडगांव येथून नंदुरबार येथे रवाना केले जाते, तर नव्या कोऱ्या ऍम्ब्युलन्सचा वापर कर्मचारी स्वतःला पर्यटणासाठी वापरली असल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे.रविवारी सकाळी सहा वाजता रुग्णवाहीका घेऊन निघालेले कर्मचारी रात्री पावणे अकरा वाजता माघारी आले. या प्रकरणाचा छडा येथील शिवसेनेचे पदाधिकारी पिंटू वळवी व बिरसा फायटर्सचे धडगांव महासचिव प्रदिप पावरा यांनी समोर आणला आहे.
धडगांव सरकारी रुग्णालयातील ॲम्बुलन्स रविवारची सुट्टीची संधी साधून रुग्णालयातीलच कर्मचाऱ्यांनी चक्क तोरणमाळ या थंड हवेच्या ठिकाणी पर्यटणासाठी नेल्याचे कळताच धडगांवचे पदाधिकारी यांनी लगेच धडगांव ग्रामीण रुग्णालय गाठले. तेथे संबंधित अधिका-यांना जाब विचारून चांगलेच धारेवर ठरले. यावेळी संबंधित अधिकारी हा सुरवातीला उडवा उडवीची उत्तरे देत दिली.
धडगांव सारख्या दुर्गम भागात रुग्णांचे हाल होऊ नयेत, म्हणून सरकारी दवाखान्यात अनेक सोयी सुविधा शासन करत आहेत; परंतु या सोयी सुविधांचा वापर हे रूग्णांऐवजी तेथील कर्मचाऱीच आपल्या वैयक्तिक जीवनात मजा करायला करत आहेत, असा आरोप शिवसेनेचे पदाधिकारी पिंटू वळवी व बिरसा फायटर्सचे महासचिव प्रदिप पावरा यांनी केला आहे.त्याला पुरावे प्राप्त झाल्यानंतर आरोप खरे ठरले आहेत. याबाबत रुग्णांच्या नातेवाईकांकडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
अनेकदा रुग्ण भंगार ॲम्बुलन्स मध्ये धडगांव येथून नंदुरबार येथे नेताना मरण पावले आहेत.तरी रुग्णांसाठी भंगार ॲम्बुलन्स वापरली जाते व चांगली अम्बुलन्स तोरणमाळला मजा मारायला नेली जाते,हे चुकीचे घडत आहे.तोरणमाळ येथे मजा मारायला ॲम्बुलन्सने नेणा-या कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करा,नाहीतर आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशाराच बिरसा फायटर्स धडगांव शाखेने प्रशासनाला दिला आहे. ॲम्बुलन्स ह्या रूग्णांच्या सेवा करायला की कर्मचाऱ्यांना मजा मारायला असा सवाल उपस्थित केला जात आहे.तोरणमाळहून धडगांवला आल्यानंतर आतील मजा मारणारे मित्र कर्मचारी फरार झाले.फक्त चालक व क्लार्कच गाडीत सापडले असल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान संबंधित नवजात शिशु रुग्णावाहीका ग्रामीण रुग्णालयात नसल्याने दुपारी दीडच्या सुमारास मांडवी येथील तन्वी गुलाबसिंग वळवी नमक बालकास उपचारासाठी नंदुरबार येथे हलविणे गरजेचे असल्याने 108 रुग्णावाहिकेने नेण्यात आले.
या ऍम्ब्युलन्समध्ये ऑक्सिजनची सुविधा नसल्याने रुग्णच्या नातेवाईकांमध्ये धाकधूक दिसून आली. तर भूजगाव येथील अत्यवस्थ बालकास नातलगंनी मोटारसायकलवर बसून उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात आणले असता तो पर्यंत तो बालक दगवला होता. तो बालक दगवला नसता तर त्यालाही नंदुरबार येथे हलवावे लागले असतें मात्र, रुग्णवाहिका नसल्याने रुग्णाची गैरसोय झाली असती. असा आरोप नातलगानी यावेळी केला.
संबंधित चालक यांनी मला न विचारता, परवानगी न घेता परस्पर तोरणमाळ येथे अम्बुलन्स नेली,असे लेखी पत्र संबंधित प्रमुख डाॅक्टरांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहे. लाखाची अम्बुलन्स रुग्णांसाठी न वापरता ऐश करायला तोरणमाळ येथे नेली म्हणून लोकांत संताप निर्माण झाला आहे.
मला कल्पना न देता रुग्णावाहीका नेण्यात आली आहे.रुग्णावाहिकेचे इंस्टालेशन अजून बाकी आहे.
अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय धडगावचे डॉ. किरणकुमार वानखेडे यांनी दिली.
रुग्णांना सेवा न देता शासकीय वाहनांचा वापर खाजगी पर्यटणासाठी करण्यात आला आहे. हा प्रकार अत्यंत धक्कादायक असा आहे. संबंधित्तांची चौकशी करून तात्काळ निलंबन करावे अन्यथा आंदोलन छेडले जाईल.
पिंटू वळवी, शिवसेना पदाधिकारी, धडगाव.









