नंदुरबार l प्रतिनिधी
एस. ए. मिनिस्ट्रीज ट्रस्ट संचलित, एस.ए.मिशन इंग्रजी पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळेत राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक संदेश यंगड होते, तर पर्यवेक्षिका रोहिणी वळवी, संगीता रघुवंशी आदी उपस्थित होते,कार्यक्रमाच्या सुरवातीला शाळेचे क्रीडा शिक्षक सिद्धार्थ साळुंखे सर यांनी मेजर ध्यानचंद यांच्या क्रीडा क्षेत्रातील योगदाना विषयी खेळाडूंना माहिती देऊन क्रीडा दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले शाळेत क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या.
तसेच विद्यार्थी यांनी विविध क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंची वेशभूषा परिधान करून विद्यार्थ्यांसमोर सादरीकरण केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहानवाज शेख यांनी केले तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक संदेश यंगड यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक व शिक्षकेत कर्मचाऱ्यांना परिश्रम घेतले.








