Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार शहरातील रस्त्यांची तत्काळ दुरुस्ती करावी शिवसेनेची नगरपालिकेकडे मागणी

team by team
August 30, 2022
in Uncategorized
0
नंदुरबार शहरातील रस्त्यांची तत्काळ दुरुस्ती करावी शिवसेनेची नगरपालिकेकडे मागणी

नंदुरबार  l

गणेशोत्सव तसेच लवकरच येत असलेल्या सण उत्सवांच्या पार्श्‍वभूमवर शहरातील रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेतर्फे करण्यात आली आहे. तसे निवेदन शिवसेना महानगरप्रमुख पंडीत माळी यांनी नंदुरबार नगरपालिकाकडे निवेदनाद्वारे केली आहे. तत्काळ कारवाई न झाल्यास शिवसेनातर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशा इशारा देण्यात आला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, नंदुरबार शहरातील रस्ते हे खड्डेमय झालेले आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु असल्याने त्यात पाणी साचुन डबके तयार होवुन तेथे डास-मच्छरांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे शहरातील नागरिकांना डेंग्यु, मलेरिया, हिवताप, चिकनगुणियासारख्या गंभीर आजारांना तोंड द्यावे लागत आहे. तसेच नंदुरबार शहरातील रस्त्यावरील खड्डे तसेच माळीवाडा ते कसाईवाडा परिसरातील ड्रेनेज वरील झाकण उघडे असल्यामुळे, मोठ-मोठे खड्डे पडल्यामुळे अपघात होवुन जिवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सध्या गणेशोत्सवाचा काळ असून सर्व व्यायामशाळेच्या मिरवणूका या शहरातील महत्वाच्या रस्त्यावरुन जाणार असल्यामुळे सदर रस्ते हे तात्काळ दुरुस्त करण्यात यावेत. तसेच येत्या काही दिवसांत हिंदु धर्मियांचे नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी आदी महत्वाचे सण-उत्सव असल्यामुळे शहरातील सोनार गल्ली, फडके चौक, घोडापिर चार रस्ता, चिराग गल्ली येथे ड्रेनेज भरुन कायम सांडपाणी रस्त्यावरुन वाहत असते. तसेच भररस्त्यावर बंद पडलेल्या भंगार गाड्या, खडी, रेती, विटा, जुन्या बंद पडलेल्या गाड्या, भंगाराची दुकाने ही गणशोत्सव मिरवणूकीच्या मार्गावरुन तात्काळ हटविणेबाबत आपण संबंधित यंत्रणेला आदेश करावेत.

नंदुरबार पालिकेच्या अधिपत्याखालील इलेक्ट्रिक पोलवरील पथदिवे हे मागील अनेक वर्षांपासून बंद असून ते देखील तात्काळ दुरुस्त करण्यात यावेत अन्यथा शिवसेनेतर्फे तिव्र आंदोलन छेडण्यात येईल व होणार्‍या विपरीत परिणामास सर्वस्वी नपा प्रशासन जबाबदार राहील, याची नोंद घ्यावी, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदनावर महानगर प्रमुख पंडीत माळी, शहर प्रमुख राजधर माळी, युवा सेना जिल्हा अधिकारी अर्जुन मराठे, युवा सेना उपजिल्हा अधिकारी सागर पाटील, युवा सेनेचे शहर अधिकारी दादा कोळी यांच्या सह्या आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

कामचुकार कर्मचाऱ्यांवर वॉच ठेवण्यासाठी ‘हजेरी’ ॲपची निर्मिती : आदिवासी विकासमंत्री डॉ.विजयकुमार गावित

Next Post

उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून प्रथम क्रमांकास 5 लाखाचे बक्षीस, सार्वजनिक गणेश मंडळांनी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

गुजरातमधून एचटीबीटी बियाण्यांची महाराष्ट्रात प्रतीकात्मक एंट्री, सीमेवर शेकडो शेतकरी उपस्थित

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

June 12, 2026
शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add